लोकदर्शन 👉.मोहन.भारती
जिवती :– महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील त्या १४ गावा पैकी एक मौजा परमडोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तत्कालीन संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना समर्पित करतांना चे अनमोल दृश्य चितारलेल्या प्रतिमेचे अनावरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार धोटे यांनी सांगितले की महुसदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून भारताला एकतेच्या मजबूत सूत्रात बांधणारे संविधन तयार केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली व २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीयांसाठी गौरव ग्रंथ आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाले असून सर्वांना सन्मानाने जगता येत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंगाचे तितकेच सुरेख चित्रण असलेली ही प्रतिमा नव्या पिढीला निश्चिततच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे.
या प्रसंगी उपसभापती केरामेरी सय्यद अब्दुल कलाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आदिलाबाद अजमेश श्याम नायक, सरपंच निलाबाई विराडे, सरपंच बालाजी सुलगे, तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, सामाजिक कार्यकर्ता नभिविलास भगत, सरपंच लिंबादास पतंगे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, रामदास रणवीर, कृ.उ.बा.स. संचालक उत्तम कराळे, सरपंच नारायण वाघमारे, विष्णू रेड्डी, दिवाकर वेट्टी, लक्ष्मण कांबळे, चंद्रभान नरवाडे, वजीर सय्यद, यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.