लोकदर्शन पाटोदा-👉 राहुल खरात
जवळ असणाऱ्या नफरवाडी येथे गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू होता या सप्ताहाची सांगता माननीय आमदार सुरेश धस अण्णा आणि वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य ह भ प प्रकाश महाराज बोधले हभप रामकृष्ण रंधवे बापू यांच्या उपस्थितीत आज दिनांक ६/५/२०२३ शनिवार रोजी झाली.
काल सायंकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य दिव्य दिंडी गावातून निघाली याप्रसंगी गावातील प्रामुख्याने महिला व पुरुष तसेच तरुण युवक वर्ग वृद्ध बालक सर्व पक्षाचे कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य या दिंडीत सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली होती याप्रसंगी गावातील महिला यांनी घरोघर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या तसेच स्वतः ह भ प प्रकाश महाराज बोधले या दिंडीत सामील झाले होते त्यामुळे नफरवाडीतील आणि पंचक्रोशीतील भक्तांनी या दिंडीला उपस्थिती दर्शविली त्यामुळे संपूर्ण वाडी नामघोशात नाहून निघाली. दिंडी राम मंदिर आणि हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर आरतीच्या वेळी महाराजांनी गावातील फौजी गोपीनाथ ढेरे बापू कवठेकर लहू ढेरे जवानांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आरतीला सुरुवात केली आज दिनांक ६/५/२०२३ शनिवार रोजी काल्याचे किर्तन प्रकाश महाराज बोधले यांचे झाले याप्रसंगी माजी मंत्री माननीय सुरेश धस यांनी समस्त गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आपले मनोगत व्यक्त करताना गावकऱ्यांना सांगितलं आपल्या गावातील शाळा तसेच धार्मिक कार्यक्रम यामध्ये राजकारण नआणता सर्व कार्यक्रम एकोप्याने करावेत असे सांगितले आणि ह भ प बोधले महाराज यांनी गावकऱ्यांना व्यसनापासून दूर राहा हे सांगून संसाररूपी सागर तरुण जायचे असेल तर संतांची सेवा करा आणि भक्ती मार्ग स्वीकारा गळ्यामध्ये पवित्र अशा तुळशीच्या माळा घाला आई-वडिलांचे सेवा करा असे प्रतिपादन केलेयाप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत गावकऱ्यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी माननीय सुरेश धस यांचे स्वागत प्रथम नागरिक बंडू सवासे यांनी केले तर हुले बापू यांचे स्वागत बंटी तांबे यांनी केले . माननीय महेंद्रजी गर्जे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुधीर घुमरे, युवा नेते श्याम फुले पारगावचे सरपंच पद्माकर घुमरे, ह भ प आप्पा महाराज घुमरे तसेच या सप्ताहासाठी उपस्थित असणारे ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व करणारे हभप दत्ता महाराज येवले गाथा भजन करणारे नफरवाडीची भजनी मंडळी धर्मवीर शंभूराजे वारकरी संस्था आळंदीचे महाराज ह भ प राधेश्याम वाकळे गायनाचार्य ह भ प सोपान महाराज पांचाळ उमरगा ह भ प अरबट महाराज बुलढाणा ह भ प नामदेव चव्हाण महाराज पाटोदा यांचे स्वागत समस्त गावकऱ्यां मार्फत करण्यात आले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सरपंच बंडू सवाशे उपसरपंच बंटी तांबे ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघ अभिजीत चव्हाण प्रशांत सवाशे लहू दराडे भरत ढेरे तसेच विष्णू मोरे आश्रुबा मंडलिक संजय सावंत सर शहाजी चव्हाण सर सोमनाथ मंडलिक रामकृष्ण तांबे कैलास चव्हाण सिद्धेश्वर तांबे शिवाजी अण्णा ढेरे बालाजी सव्वाशे बाजीराव सव्वाशे आबाराजे चव्हाण उपसरपंच माजी शिवाजी सवाशे व नफवाडीतील भजनी मंडळी तसेच सर्व ग्रामस्थ महिलावर्ग तरुण युवक वर्ग बालगोपाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून कार्यक्रम पार पाडला गावातील ग्रामस्थांनी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे गाव जेवण यशस्वीरित्या पार पाडले . सव्वाशे तांबे मंडलिक दराडे ढेरे गिरमकर चव्हाण या साऱ्या मंडळीने आणि कार्यक्रमाचे शोभा वाढविण्यासाठी पाटोदा परिसरातून लोक कार्यक्रमास उपस्थित होते
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सर्व उपस्थित त्यांचे आभार मानून महाप्रसादाचा लाभ घेऊन झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव तांबे आणि श्री संजय सावंत सर यांनी केले होते.