आटपाडी,कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन साजरा!

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन दिन साजरा करण्यात आला. कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व त्यानंतर एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.भारती देशमुखे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी समग्र कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शेतकरी , कष्टकरी वर्ग, महिला, दलित वर्ग , शिक्षण, समाज सुधारक म्हणून त्यांचे काम अतिशय महान आहे. यावेळी प्रा.बालाजी वाघमोडे प्रा.संतोष सावंत प्रा.डॉ.बाळासाहेब कदम श्री प्रा.सुजित सपाटे प्रा.सारिका घाडगे प्रा.सुप्रिया मोरे प्रा.भगत प्रा.अनिता निकम प्रा.आप्पासाहेब हातेकर श्री.विश्वेश्वर खंदारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here