लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
जिवती दि.४मे२०२३ चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीतालुक्यातील सेवादास नगर या गावाची.लोकसंख्या जवळपास 1077 असून या गावाची निर्मिती 70 वर्षापूर्वी होऊन सुध्दा या गावात पण्याकरिता आज पर्यंत राबराब करावी लागत आहे.गावात जलस्वराज्य, शिवकालीन,राष्ट्रीय पेय जल योजना अश्या प्रकारे योजना राबवून सुद्धा आज पाण्याची टंचाई भासत आहेत.तसेच 2022-23 मध्ये सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत 22 लाखाची योजना मंजूर असून ती योजना स्थगित करावी कारण सेवादास नगर हे टेकडी भाग मोडत असल्याने पाणी मुबलक प्रमाणे लागत नाही त्या करिता कमीत कमी 5 km अंतरावरून विहीर खदून गावा तील टाकी पर्यंत आणून पाणी सोडण्यात यावे.तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पेय जल योजना राबवली पण त्या योजना अंतर्गत कोणी एक थेंब पाणी शुद्ध पाणी वापर केला नसून सबंधित इंजिनिअर यांनी पूर्ण बिल काढून दिले तसेच त्याबद्दल सूचना मा.आदरणीय धोटे साहेब आमदार यांना दिले.तसेच राष्ट्रीय पेय जल योजना बदल निरीक्षण करावी.तसेच सेवादास नगर येथे विशेष करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन ग्राम पंचायत नोकेवाडा येथील उपसरपंच सुधाकर जाधव यांनी व्यक्त केला आहेत.
*विविध योजना राबविल्या तरी पाणी टंचाई*
सेवादास नगर या गावाला बसून 70 वर्ष पूर्ण होत असून सुद्धा बैल गाडी वर पाणी आणावे लागत आहेत.आमची पिढी पाणी आणत गेली तरी समोरील पिढी सुद्धा खांद्यावर आणि बैल गाडीवर पाणी आणावी लागत आहेत,तसेच जलस्वराज्य,शिवकालीन,राष्ट्रीय पेयजल योजना राबून त्या करिता त्या योजना चंगल्या प्रकारे कामे केले नसून संभधित इंजिनी र कीव्हा अधिकारी यांनी पूर्ण बिल कडून दिले असताना सेवादास नगर येथे अपूर्ण काम केले आहेत, त्यामुळे चौकशी करून कार्यवाही करावं.त्यामुळे सेवादास नगर येथे पाणी टंचाई कमी झाली नाही.तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार विशेष लक्ष द्यावे आणि राष्ट्रीय पेय जल योजना याबद्दल चौकशी करून इंजिनियर आणि अधिकारी यावर कार्यवाही करण्यात यावी असे प्रतिपादन स्थानिक नागरिक करिता आहेत.