,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन छत्रपती शिवाजी नगर 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
छत्रपती शिवाजी नगर येथे 1 मे ला कामगार दिन च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सातारा येथील समाजसेविका श्रीमती राजश्री सुनील शिंदे यांना उत्कृष्ट लेखिका पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले,
समाजसेविका राजश्री शिंदे उद्योजक व लेखिका असून 2 चित्रपटात लेखन,पटकथा संवाद केले आहेत,
आई ची हाक झाली काळजाची राख,व सुदर्शन या चित्रपटाचा समावेश आहे, याशिवाय कविता, लेख,शेर शायरी च्या माध्यमातून प्रबोधन केले आहे, संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार, उपलब्ध करून दिला आहे, महिला च्या आवडीनुसार त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन गृह उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभे केले आहेत,
अशा अष्टपैलू व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती राजश्री शिंदे यांच्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन त्यांना राज्य सचिव दीपक मस्के,महासचिव गोरख भारसाळे, किशोर भालेराव, सायली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला,
श्रीमती राजश्री शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहेत,
,