लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा:– राजुरा पंचायत समितीची वर्षे २०२२ – २०२३ ची वार्षिक आमसभा श्री. छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून आमसभेला सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी सेवा निवृत्त सहायक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे यांचा आ. धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत केंद्रप्रमुखांना टॅबचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्याम वाखर्दे,
मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, उप मुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपेंद्र हिरूटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपिल कलोडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर विविध ग्रामपंचायतीमधील वस्तूस्थिती काय आहे, आक्षेप काय आहेत, प्रलंबीत मागण्या, वंचित लाभार्थी, विविध समस्या जाणून घेतल्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे तसेच जिथे जिथे वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे तीथे आपण आवश्यक पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. शासकीय योजनांच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधीत विभाग प्रमुखांना दिल्या.
या प्रसंगी तालुका विद्युत विभाग, कृषी, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शालेय पोषण, पशुसंवर्धन, पंचायत, समाज कल्याण, उमेद अभियान, स्वच्छ भारत अभियान, घरकुल, मनरेगा, परिवहन, जि. प उपविभाग, राजुरा उपविभाग, एकात्मिक बाल विकास, मृद व जलसंधारण, भुमी अभिलेख, राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण, ग्रामीण जिवन्नोती अभियान इत्यादी अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी केले. संचालन गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी रवींद्र रत्नपारखी यांनी केले.