लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*चंद्रपूर*:- लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कूल ज्ञानमंदिर हवेली गार्डन येथे दी 23 ते 27 ला राष्ट्रसेविका समितीचा वर्ग शिबिर संपन्न झाला.वर्गा ला८स्थानां वरून ५४ सेविका भगिनी उपस्थित होत्या.वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मा.शाळेच्या मुख्याध्यापिका मा रश्मी ताई कावडकर होत्या. वर्गाच्या सर्वोधिकारी श्रीमती नीता ताई पंत, वर्ग अधिकारी अंजली हिरूरकर, मुख्य शिक्षिका की.सिध्दी दुआसी ,सह.शिक्षिका शितल गौरकार,माया खंगार होत्या.
वर्गात श्लोक, गीत, व्यायाम योगासने योगचाप, नियुद्ध, दंड,याच बरोबर बौध्दिक सत्रात समितिच्या महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन, चर्चा कार्यशाळा घेण्यात आले.
डॉ.यामिनी पंत यांनी मुलींना उमलत्या मुलींच्या भावविश्वाचा उलगडा करून,शरीर स्वच्छता, मासिक पाळीत घ्यायची काळजी या विषयावर स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले.
अनघा येनारकर यांनी जीवनात आवश्यक निसर्गोपचार या विषयावर मार्गदर्शन केले. अ.भा.अधिकारी भारतीय शिक्षण मंडळ मा.अरूंधती कावडकर यांनी वर्गाला भेट देऊन मुलींना प्रोत्साहित केले.
दि.२६ला सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली.त्याच समापन शीतला माता मंदिर शाखा स्थानावर संपन्न झाले.मंदिराच्या कमिटीने मोठ्या उत्साहात स्वागत केले.
दि.२७ला समारोपीय
सत्राला प्रमुख पाहुणे मा.स्वामिनी हरिप्रियानंदा जी उपस्थित होत्या.आपल्या उद्बोधनात त्यांनी सेविकांना प्रामाणिक प्रयत्न केला तर कोणीही
आपल्या ध्येयाकडे पोहोचु शकतो.आहे त्या
परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे.
समारोपाच्या वक्ता मा.अनिताताई लांबे, प्रांत संपर्क प्रमुख यांनी
” हम बेटी हिंदुस्थान की” या मध्यवर्ती कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन मुलींनी आपल्या जीवनात कसा बदल करावा, वैयक्तिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून राष्ट्राप्रती आपले योगदान द्यावे.स्वसंस्कृती, स्वभाषा, स्वराज्य,स्वराष्ट्र या संकल्पना कायम मनात रूजवुन स्व चारित्र्य निर्माण करावे.यातुनच उत्तम व्यक्तीमत्व विकास साधला जातो.
असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन अस्मिता गडकर जिल्हा संपर्कप्रमुख यांनी केले.कु.मनस्वी डेहनकर हिने श्लोक, स्नेहा मिसार यांनी वै.गीत सादर केले.आभार प्रदर्शन विभाग कार्य.वनिता मडपुवार यांनी केले.वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला अनेक जेष्ठ सेविका भगिनींनी ची उपस्थिती होती.वर्गाच्या यशस्वीतेसाठी वैशाली थावरे,माया खंगार,शरयु लोहे, श्रध्दा सलोटे, अभिलाषा मैदंळकर, माधवी भागवत, स्नेहा मिसार,संध्या घाटे, सोनाली कोनेर, अश्विनी दाणी,दर्शना थोटे वंदना एंगलवार यांनी परिश्रम घेतले.