आज गडचांदूर ‘बस स्थानक’ साठी ‘भीक मांगो आंदोलन’

 

लोकदर्शन गडचांदूर :-👉 अशक्कुमार भगत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार जागे व्हा, गडचांदूर बस स्थानकाकरिता भीक मागलेला निधी घ्या, या अनोख्या आंदोलक भूमिकेतून वंचित वंचित बहूजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक 2 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता भीक मांगो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक शहर म्हणून परिचित असलेल्या नगर परिसरात तब्बल 4 सिमेंट उद्योग आहेत. 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरात नगरपालिका अस्तित्वात असली, तरी साधे बस स्थानक नाही. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने बस स्थानक उभारण्यात आले नाही, असे कारण पुढे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात वंचित बहूजन महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडी व स्थानिक जनता भीक मागून तो निधी बस स्थानक उभारावे यासाठी शासनाला देणार आहेत.

या अनोख्या भीक मांगो आंदोलनात गडचांदूर परिसरातील पीडित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहूजन आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here