- ****************
लोकदर्शन कल्याण 👉गुरुनाथ तिरपणकर
भारताच्या ग्रामविकासाचे अग्रणी असणारे पद्मश्री
डॉ.मणीभाई देसाई यांनी जीवनभर समर्पित भावनेने ग्राम सुधारण्याचे व जनकल्याणाचे कार्य तहयात केले मणीभाईजीच्या कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एक प्रकल्प होईल म.गांधीजींना वचन देऊन त्यांनी जीवनभर विविध क्षेत्रात राष्ट्रसेवा करून निष्काम कर्मयोग साधला, पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेमुळे राष्ट्रात नवनिर्मिती होते पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार व जयंती कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले शांती सेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जा स्त्रोत्र पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग संलग्नित आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आरंभीत भारत सरकार वतीने मॅगसेस पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ.मणीभाई जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे यांच्या हस्ते सुनील इंगळे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला यावेळी प्रसाद चौधरी जीएसटी टॅक्स असि.कमिशनर, संजय देशमुख अध्यक्ष अखिल भारतीय लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ, मीना भाऊ खर्चे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ , यतीन ढाके मुख्य संपादक दैनिक जनशक्ती , श्याम पाटील संपादक लेवा जगत इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याचे हे तीसावे वर्ष असून एकूण ९० सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला , सदर समारंभाचा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ येरवडा पुणे येथे संपन्न झाला, शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.