ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

–——————————————–

लोकदर्शन-गडचांदूर -👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
–ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूल,गडचांदूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटॊची पूजा करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांचे शुभ हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विध्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार, उत्तम खैरे, प्राचार्या सौ निर्मला ठावरी,संतोष राठोड आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते ,यावेळी सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार म्हणाले की महाराष्ट्र राज्याला संतांची परंपरा लाभली असून अनेक थोरपुरुष या राज्यात होऊन गेले त्यांच्या विचाराने आपण सर्वांनी पुढे गेले पाहिजे असे ते म्हणाले
सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार यांनी संस्थेनी आपल्या अल्प काळात प्रगती करून उत्तम विध्यार्थी घडवित असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी व ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्या सौ निर्मला ठावरी यांचेही मोलाचे मार्गदर्शन झाले संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक पंकज ढोके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सौ रेखा पाटील, सौ शिल्फा पिंपळकर,सौ प्रतिभा मंदे,सौ अनुपमा पांडे,सौ सुनीता धकाते,कु पौर्णिमा बोधे यांनी सहकार्य केले यावेळी विध्यार्थी, शिक्षक ,पालक मोठया संख्येनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here