लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्याने दिनांक ०१ मे २०२३ रोजी तहसील कार्यालय राजुरा येथे सकाळी ठिक ८:०० वाजता लोकप्रिय आमदार *मा. श्री. सुभाष धोटे* यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या प्रसंगी आ. धोटे यांनी क्षेत्रातील जनतेला महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, नायब तहसीलदार अतूल गांगुर्डे, संजय चिंगलवार, मुख्याधिकारी सूरज जाधव, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगरदेवे, उपविभागीय पुरवठा अधिकारी सविता गंभिरे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय जलसंधारण अभियंता पोहन बल्की, माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे, धनराज चिंचोलकर, डॉ. उमाकांत धोटे, कविता उपरे, साधना भाके, उज्वला जयपूरकर यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.