पनवेल ग्रामीण विभागाचे कर्तव्य दक्ष पोलीस इन्स्पेक्टर जगदीश शेलकर ♦️आदिवासी समाजातील लोकांचे प्रश्न समजावून घेणारा पोलीस अधिकारी ♦️उरण सामाजिक संस्थेच्या वतीने झुंज क्रांतिवीरांची पुस्तक भेट देवून विशेष सत्कार

 

लोकदर्शन उरण 👉दिविठ्ठल ममताबादे

 

उरण दि 25 दिनांक 25/04/2023 रोजी वाघाची आदिवासी वाडी, मुक्काम माळदुंगे, तालुका पनवेल येथील गणपत नामदेव वाघ आणि कुटुंबीय यांनी अवैध जमीन हस्तांतरण प्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर जगदीश शेलकर यांची उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जगदीश शेलकर यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून चौकशीचे आदेश दिले. दोन्ही बाजू समजावून घेवून योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबद्दल आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.काही वर्षांपूर्वी जगदीश शेलकर हे उरण तालुक्यातील न्हावा शेवा पोलीस स्टेशन नंतर नवी मुंबई ट्रॅफिक विभाग येथे कार्यरत होते.आणि आत्ता पनवेल तालुका ग्रामीण विभाग पोलीस स्टेशन मधील कर्तव्य दक्ष पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नाव लौकीक मिळवला आहे. कायद्याचा चांगला अभ्यास असल्यामुळे नेहमीच सत्याची बाजू घेवून आदिवासी, गोर गरिबांना मार्गदर्शन आणि मदत करून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत त्यातील उरण तालुक्यातील दोन किस्से इथे नमूद करण्यासारखे आहेत.
1) करंजा उरण येथे बिबट्या ने धुमाकूळ घातला होता. तेंव्हा त्याला पकडण्यासाठी सामजिक संस्था , वन विभाग, पोलीस विभाग , फायर ब्रिगेड इत्यादी प्रयत्न शिल होते. परंतु त्यातील जगदीश शेलकर यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुढे सरसावले होते. त्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला पण त्यालाही न घाबरता त्यांनी त्याच्याशी झुंज सुरू ठेवली आणि आपली सुटका करून घेतली. त्यात ते जखमी देखील झाले. तरीही त्यांनी त्या अवस्थेत ही बिबट्याला जेरबंद केले.

2) जेएनपीटी टाउनशिप मध्ये दोन व्यक्तींची आपापसात मतभेद होऊन जीवे मारण्यासाठी मारामारी सुरू होती. हातात धारधार सुरा, खिश्यात पिस्तूल असतानाही स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जगदीश शेलकर आत घुसले आणि त्याच्या अंगावर झोकून दिले. आधी हातातील सुरा घेतला आणि नंतर पिस्तूल जप्त केले. त्या क्षणी काहीही होवू शकले असते परंतु जगदीश शेलकर यांनी प्रसंगावधान आणि हिंमतीने त्यांना काबू केले.असे कर्तव्य दक्ष अधिकारी प्रत्येक विभागात असणे आवश्यक आहे.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आणि उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांनी त्यांच्या कार्यालयात जावून झुंज क्रांतीविराची हे पुस्तक देऊन विशेष सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here