समाजभूषण कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात. ⭕अनेक मान्यवरांचा आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते गौरव

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– दि.25/04/2023 ला श्री. छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे समाजभूषण, समाजरत्न मा. कृष्णाजी भोयर यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यांची पत्नी सौं. बयनाबाई यांचा 75 वा व मुलगी श्रीमती सुनीता जुनघरे यांचा 50 वा वाढदिवस ही त्याच वेळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णाजी नागपुरे (अध्यक्ष, चं. जि. भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर ) हे होते. मंचावर राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप, कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, भोई संघटनेचे सचिव देवराव पिंपळकर, उपाध्यक्ष रमेश नागपुरे, गजानन उमाठे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या तर्फे ४० च्या वर सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार सुभाष धोटे यांनी श्री. कृष्णजी भोयर, सौ बैनाबाई भोयर, सुनीता जूनघरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच “इंडिया बुक आफ रेकार्ड “विजेते श्री कृष्णाजी नागपुरे, श्री मोरेश्वर खेडेकर, मारोतराव कापटे, रमेश नागपुरे, सुवर्णा कामडे, गजानन उमाठे यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व वक्त्यांनी भोयर सरांच्या कार्याचा गुणगौरव केला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश वागधरे, गजानन उमाठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश नागपुरे यांनी केले. भोयर सरांच्या मुलींनी, जावयानी, नातू, नाती, गजानन उमाठे, मोरेश्वर खेडेकर व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हा वाढदिवस सोहळा यशस्वी केला. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, बल्लारपूर, हिंगणघाट आणि अनेक ठिकाणचे समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here