लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे दिनांक ३० एप्रिल २०२३ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, प्रा.मुप्पीडवार, प्रा.कु.ताकसांडे मॅडम इ. उपस्थित होते. तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अध्यक्षीय मार्गदर्शनातून मुख्याध्यापक काळे यांनी तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर तसेच १९४२ च्या चले जाव आंदोलनातील चिमूर येथील संघर्षाची माहिती व स्वातंत्र्य चळवळीतील योगदाना बद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींनी सुद्धा तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करताना त्यांनी केलेल्या राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृशोद्धार, व्यसनमुक्ती इत्यादी कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालक ज्येष्ठ शिक्षिका कु. ज्योती चटप तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण मरसकोल्हे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रा.गुजर, प्रा.जहीर प्रा. पोडे, प्रा.मेहरकुरे,नामदेव बावनकर, राजेश मांढरे, भालचंद्र कोंगरे, सोनटक्के काकाजी, सिताराम पिंपळशेंडे, शशिकांत चेन्ने, संकल्प भसारकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
,