लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – राष्ट्रसंतांचे विचार समाजाला तारणारे असून त्यांनी मानवी जीवनाशी निगडित प्रत्येक घडामोडीवर ग्रामगीतेच्या माध्यमातून लिखाण केले आहे. त्यांच्या विचारातून सुसंस्कृत समाज निर्मित होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल माहूरे, पर्यवेक्षक हनुमान मस्की, भिमस्वरुप हस्ते, शंकर तुरानकर उपस्थित होते. यावेळी प्रा. आशिष देरकर यांनी आपल्या भाषणातून शिक्षण, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, सतसंगती, सर्वधर्मसमभाव, अध्यात्म, विज्ञान इत्यादी बाबतीत राष्ट्रसंतांच्या साहित्यावर आपल्या भाषणातून विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप परसुटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयंती समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.