लोकदर्शन राजापूर 👉 (गुरुनाथ तिरपणकर)-
शासनाच्या नियत वयोमानानुसार शैक्षणिक सेवाकाळाची वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीत संपवून ३१मे २०२३रोजी भास्कर परशुराम गुरसाळे गुरुजी ३९वर्षाच्या शिक्षकी पेशात सेवा करुन निवृत्त होत आहेत.एक उपक्रमशिल आणि प्रयोगशिल शिक्षक,हाडाचा कार्यकर्ता,विद्यार्थी प्रिय अध्यापक आणि सर्वांशी मैत्रीचे नाते जोडून,माणुसकीचे नेटवर्क निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे भास्कर गुरसाळे गुरुजी.यांच्या सेवानिवृत्त निमित्त ऋणनिर्देश समारंभ नुकताच गजानन मंगल कार्यालय,ओणी,ता.राजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी शैक्षणिक,सांस्कृतिक,उद्योग,क्रिडा,सामाजिक,राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.प्रथम ढोल-ताशांच्या गजरात भास्कर गुरसाळे गुरुजींचे सभागृहात आगमन झाले,गुरुजी सर्वांसमोर नतमस्तक झाले.काही वेळ सर्व स्तभ होते.गुरुजींच्या डोळ्यात आपसुकच अश्रू तरळले व सर्वच भारावून गेले व भावूक झाले.अर्थात तो ह्रदय क्षण पाहुन सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले.भास्कर गुरसाळे गुरुजींच्या या ३९वर्षाच्या यशस्वी वाटचालीत त्यांना पत्नी सौ.स्मिता गुरसाळे यांनी भरीव साथ दिली.गुरुजींच्या जीवनात त्याचे योगदान व सिंहाचा वाटा आहे.गुरसाळे गुरुजींना जिल्हा गुणी शिक्षक पुरस्कार,मुलींची उत्कृष्ट पट नोंदणी पुरस्कार,गुरुवर्य पुरस्कार,जि.प.आदर्श शिक्षक पुरस्कार,पंचायत समिती तालुका गुणी शिक्षक पुरस्कार,असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य कोष्टी समाज सेवा संघ मुंबई-सहसचिव,आरगाव सर्वोदय जनता संस्थेचे मुंबई सल्लागार,मौजे खरवते ग्रामविकास मंडळ मुंबई/ग्रामीण सरचिटणीस,संचालक,उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा सहकारी शिक्षक पतपेढी अशी सामाजिक संस्थांनकडुन मानाची पदे भूषविलेली आहेत.तसेच रत्नागिरी,चिपळुण,ओणी,राजापूर,खरवते व आजुबाजुच्या पंचक्रोशीत भास्कर गुरसाळे गुरुजींचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे.ऋणनिर्देश समारंभात विविध संस्थांनी,मान्यवर व्यक्तींनी सन्मानपत्र,मानपत्र,सन्मानचिन्ह व शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रम एवढा बहारदार झाला की विद्यार्थी,सहशिक्षक,माजी विद्यार्थी ज्यांची मुलेही वडिलांचे विद्यार्थी झाले होते,असे पालक,विविध क्षेत्रातील पदाधिकारी,मान्यवर अशा अनेकांनी गौरवपर मनोगते व्यक्त केली.तसेच भास्कर गुरसाळे गुरुजींच्या सेवानिवृत्त प्रित्यर्थ विशेष”अरुणोदय”या गौरवांक चे प्रकाशन करण्यात आले.वेळे अभावी काहींना बोलण्याची संधीही मिळाली नाही,गुरसाळे कुटुंबियांनाही व्यक्त होता आल नाही पण ऋणनिर्देश समारंभ याची देही याची डोळा पाहुन कृतकृत्य झाले.संकेत गुरसाळे यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.