लोकदर्शन 👉 मोहन भारती
एकीकडे केंद्र सरकार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा पाठपुरावा करते तर दुसरीकडे गाव पातळीवर मात्र दिव्यांगांना फक्त हेलपाटेच खावे लागतात
वयो मर्यादेची अट स्वमरजीने टाकून सत्ताधाऱ्यांनी अपंगांना धुरेवर ठेवले
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपंगांना पाच टक्के निधी वाटप नगर परिषद अंतर्गत करण्यात येणार यामुळे दिव्यांग बांधवात आनंदाचे वातावरण होते
पण हलाखीच्या परिस्थितीत असणारी औद्योगिक क्षेत्र गडचांदूर मधील नगरपरिषद व सत्ताधारी मंडळी हास्यस्पद कारभार करीत असल्याचे चर्चेत येत आहे
शासनाच्या नियम अटीनुसार शहरातील प्रत्येक दिव्यांगांना पाच टक्के निधी अंतर्गत वाटप करण्यात येते. परंतु अनेकांची नावे स्वतः ठराव घेऊन नगर अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांनी खोडून टाकली या नगर परिषदेतील मनमानी कारभाराने गावात दिव्यांग बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे
संपूर्ण दिव्यांग बांधवांना पाच टक्के अपंग निधी वाटप करण्यात यावा अन्यथा नगरपरिषदेच्या मदतीसाठी दिव्यांग बांधव गावात हातात कटोरी घेऊन गावभर भीक मागून आंदोलन करून नगरपरिषद ला मदत करू या संदर्भात तात्काळ निर्णय न झाल्यास अपंग विकास महामंडळ महाराष्ट्र शासन तथा जिल्हा अधिकारी साहेब चंद्रपूर व पालकमंत्री चंद्रपूर यांच्याकडे संदर्भीय विषयाची माहिती पुरवून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी इशारा दिला आहे