लोकदर्शन मुंबई-परेल 25 ; 👉राहुल खरात
परेल येथील शिरोडकर हायस्कूल, मिनी हॉल मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात “कारा” या लघुचित्रपटातील प्रणाली निमजे यांना शाल्मली सुखटणकर या व्यक्तिरेखासाठी उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनय पुरस्कार. प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आर्यारवी एंटरटेनमेंट चे सर्वेसर्वा महेश्वर भिकाजी तेटांबे, प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे, चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे, रात्रीस खेळ चाले फेम संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडये, अभिनेत्री सिद्धी कामथ, कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट, अभिनेते मकरंद पाध्ये, प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगावकर, अभिनेते, दिग्दर्शक अनंत सुतार, सुरेश डाळे, मनिष व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रणाली निमजे यांनी आतापर्यंत “प्रश्न कायद्याचा आहे”, ” लखनौ ते लाहोर 1947″, “अशुद्ध बिजापोटी”,”अर्जुन कीं अभिमन्यू”, ” सलवा जुडूम” ,* अशा अनेक नाटकांतून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. “प्रश्न कायद्याचा आहे” आणि “सलवा जुडूम” नाटकासाठी त्यांना विशेष अभिनयाची पारितोषिके देखील मिळालेली आहेत.
प्रणाली यांनी आतापर्यंत विविध सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे. त्या भारतीय महिला इतिहास संग्रहालयाच्या सदस्या असून त्यांनी अनाथाश्रमा साठी निधी उभारल्याबद्दल ” सोशल वर्क स्टार बॉम्बे टाइम्स” हा पुरस्कार “आय कॅन फौंडेशन आणि हायपेजमिडिया” प्रस्तुत “वुमन ऑफ सबस्टॅन्स अँड नेटवर्क अवॉर्ड 2023” या संस्थे द्वारे “प्रोफेशनल वुमेन अचिव्हर अवॉर्ड” असे सन्मान प्राप्त झालेले आहेत. अभिनय क्षेत्रा बरोबर त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटविला आहे. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक 2022 साठी रनवे मॉम मॉडेल,
एआरवेन्चर प्रस्तुत फॅशनिस्टा ऑफ द इयर या सौंदर्य स्पर्धेमध्ये “मिसेस फॅशनिस्टा ऑफ द इयर 2021” हा किताब पटकावला.
त्यांच्या या दैदिप्यमान कार्याबद्दल मुंबई शहरांत त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.