by : Ajay Gayakwad
वाशिम /मालेगाव : – मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत झालेल्या नित्कृष्ट काम केल्या प्रकरणी 24 एप्रिल पासून उपोषण सुरू केले होते.मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. चौथ्या दिवशी बसपाने त्वरित पाठिंबा देऊन कार्यकारी अभियंता मिठेवाड यांना बोलून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भाऊ ताजने व अविनाश भाऊ वानखेडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. लेखी स्वरूपामध्ये आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता केली. लवकरात लवकर चौकशी समिती नेमून कार्यवाही संबंधात श्रेणी एक अभियंता मालेगाव व कार्यकारी अभियंता मिठेवाड वाशिम यांच्याशी लेखी पत्र घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.