गडचांदूर बीबी शेत शिवारात वीज पडून 36 मेंढ्या मृत्युमुखी मेंढपाळाचे पाच लाखाच्या वर नुकसान.

लोकदर्शन 👉प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपणा तालुक्यातील नांदा बीबी गडचांदूर परिसरात दुपारच्या नंतर अचानक वातावरणात झालेल्या मेघगर्जना विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली यावेळी गडचांदूर येथील जब्बार कुरेशी हे बीबी येथील स्वप्निल टोंगे यांच्या शेतशिवारात च्या परिसरात आपल्या मेंढ्या चारत होते मात्र अचानकपणे मेंढ्यांच्या कळपावरती वीज कोसळल्याने 36 मेंढ्या जागीच ठार झाल्या व शिल्लक पैकी सहा ते आठ मेंढ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्या सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे जब्बार कुरेशी यांचे जवळपास पाच लाखाच्या वर नुकसान झालेले असून घटनेची माहिती वनविभाग व महसूल विभागाला मिळतात परिसराचे पटवारी जाधव यांनी घटनास्थळी येऊन घटना पंचनामा केला अचानक पणे उडवलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे फारच मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्यांना लवकरात लवकर आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here