लोकदर्शन आटपाडी👉राहुल खरात
आटपाडी दि . २२
भारतीय संविधान, भारतीयांचा ” श्वास ” आहे . हा श्वास संरक्षित, सुरक्षित, निर्धोकपणे सदैव चालला पाहीजेत. यासाठी सर्वांनी सजगतेने संविधान विरोधक अर्थात मनुस्मृती समर्थक वेळीच रोखले पाहीजे . असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
होलार समाज विकास प्रतिष्ठान च्या वतीने महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संविधान की मनुस्मृती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते . त्यावेळी वक्ते म्हणून सादिक खाटीक बोलत होते . अध्यक्षस्थानी नाथन केंगार हे होते .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी, गुलामगिरी, वर्ण, जात व्यवस्था वाढीस लावणारी, मानवता विरोधी शुद्र आणि स्त्रीयांवर अन्याय, अत्याचार करणारी मनुस्मृती जाळून टाकली . अनेक महापुरुषांच्या शेकडो वर्षाच्या लढ्याला निर्णायक यश मिळवून देण्याचे काम डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रचंड कार्य आणि संविधान निर्मितीतून केले आहे. *आम्ही सारे भारतीय* या भावनेतून *”जयभीम”* चा अंतर – बाह्य जागर करत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनाच आदर्श मानले पाहीजे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य प्रणाली, हीच सर्वच प्रश्नांवरचे समर्पक उत्तर आहे . प्रत्येक भारतीयाला परिपूर्ण करण्यासाठी, भारतीय शिक्षण व्यवस्थेत, भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या कार्याचा, पहिल्या इयत्तेपासून सर्व विभागाच्या पदवीपर्यत अभ्यासक्रमाचा भाग बनविला पाहीजे . यातून समृद्ध बनणाऱ्या पीढ्यांपुढे संविधान आणि महापुरुषांच्या विचाराच्या विरोधातील कोणतीही विचारधारा टिकू शकणार नाही . असे ही सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
मनुस्मृती विरोधातील आणि संविधान समर्थनाची लढाई ही आमची अस्तित्वाची लढाई आहे . संविधान जागृती साठी येत्या वर्षभर खुप काम करायचे असून पश्चिम महाराष्ट्रात १००० संविधान प्रचारक तयार करण्याचा मानस आहे. हा उपक्रम राज्यातही यशस्वी व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे *सामाजीक कार्यकर्ते ललीत बाबर* यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या दिशादर्शक वाटेने जात समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणूनच आपण कसलीही अपेक्षा न करता राज्यभर प्रबोधन करीत फिरत आहोत अशा भावना व्यक्त करून हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून कोट्यावधी भारतीयांना बाहेर काढण्याचे, त्यांना सुरक्षित, संरक्षीत, करण्याचे काम संविधानाने केले आहे . असे मत *प्रमुख वक्ते भिमराव गाडे* यांनी व्यक्त केले . मनुस्मृती च्या माध्यमातून झालेले अन्याय, अत्याचार यांवर सखोल विवेचन करत भारतीय संविधानच समस्त भारतीयांचा खरा आधारवड असल्याचे ही भीमराव गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
महत्प्रयासाने, महाप्रयत्नाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविताना संविधानाचे संवर्धन संरक्षण झाले पाहीजे . संविधान वाचविण्यासाठी ” भाजपा हटावो – देश बचावो ” हा नारा वास्तवात आणला पाहीजे . रात्र वैऱ्याची असून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी या पुढच्या काळात जागल्याची भुमिका पार पाडली पाहीजे असे आवाहन आपल्या *अध्यक्षीय भाषणात प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नाथन केंगार* यांनी केले .
प्रतिष्ठानचे खजिनदार दादासाहेब केंगार व सचिव कॉम्रेड नंदकुमार हातेकर, सुखदेव गुळींग साहेब यांनी मार्गदर्शन केले. स्वागत प्रास्ताविक नंदकुमार हातेकर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश ऐवळे सर यांनी केले. यावेळी दिग्दर्शक रविकिरण जावीर, अभिनेत्री सौ . अनिषा जावीर, जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सागर, आनंदराव ऐवळे पंच, सुरेश मोटे सर, पिंटू ऐवळे, संजय जावीर, रोहित जावीर, विनोद शिंदे ,सत्यवान जावीर सर , प्रा. अजित केंगार , रणजीत ऐवळे , आप्पा जावीर, सुनिल ऐवळे सर, दत्तात्रय कांबळे, सुनिल हातेकर, सुरेखा गुळीग, विद्या ढोबळे, अशोक जावीर, प्रतीक जावीर, मकरंद केंगार, सुशांत गुळीग इत्यादी अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सुखदेव गुळीग, आनंदराव ऐवळे, रणजीत ऐवळे व गणेश ऐवळे सर यांनी केले, यावेळी होलार समाज विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,आभार रणजित ऐवळे यानी मानले.