लोकदर्शन 👉 राहुल खरात
*फुले एज्युकेशन तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती दिनी लोकशास्त्र सावित्री कलाकार सन्मानित !!!*
पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने समतावादी विचारांचा प्रसार करून क्रांती घडविणारे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 918 व्या जयंती दिनी दि. 22 एप्रिल 23 रोजी रात्री 9 वाजता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रात थिएटर ऑफ रेलेवंसच्या *लोकशास्त्र सावित्री* च्या कलाकारांचा महात्मा फुले उपरणे,महात्मा फुले गीत चरित्र आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा ,अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ व सत्यशोधिका आशा ढोक यांचे शुभहस्ते भेट देऊन लेखक दिग्दर्शक रंगचिंतक मंजुल भारद्वाज व मुख्य कलाकार अश्विनी नादेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर,तुषार म्हस्के,संकेत आवळे,विद्या आवळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सत्कारास उत्तर देताना रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणाले की भारतात बसवेश्वर महाराजांचा जन्म झाला म्हणून सत्ययुगाचा प्रारंभ झाला त्यामुळे आपण त्यांना समतानायक आद्य समाज सुधारक म्हणतो . त्याचप्रमाणे सत्यशोधक महात्मा फुले यांचे कार्य खूप महान होते , म्हणूनच शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचले.पुढे भारद्वाज म्हणाले की आज देखील विज्ञानयुग असताना मानवता व समतावादी महापुरुषांचे विचार रूजविण्यासाठी कलाक्षेत्र अत्यंत उपयुक्त आहे. या क्षेत्रात देखील ठराविक लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी व सत्य आणि वास्तववादी विचार रुजविण्यासाठी तसेच नवीन कलाकारांना योग्य ती समानसंधी मिळावी म्हणून सत्यशोधक कलाकार निर्मिती करण्याचे काम आम्ही कार्यशाळेच्या माध्यमातून शहरांपासून खेड्यांपर्यंत करीत आहोत.
यावेळी कलाकार अश्विनी व सायली यांनी सांगितले की, आमच्या लोक-शास्त्र सावित्री आणि गोधडी नाटकाला महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्याने त्याची चर्चा परदेशात होऊ लागल्याने त्यांच्या मागणीवरून आम्ही लवकरच परदेशात देखील हे दोन्ही नाटक सादर करणार आहोत. पुढ्ये त्या म्हणाल्या की महात्मा बसवेश्वर ,महात्मा फुले ,सावित्रीबाई ,डॉ.
बाबासाहेब , यांनी कर्मकांड अंधश्रध्दा याला मूठमाती देऊन समाजात समता, मानवता याचे कार्य केले त्या विचारांची शिदोरी घेऊन आजच्या काळात नाटकातून आम्ही समाजाला उन्मुक्त केले म्हणूनच तर आपल्या संस्थेने आमचा यथोचित गौरव केला असेच प्रेम मिळत राहो.
सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की सत्यशोधक समाज स्थापना दीन शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने आम्ही देखील समाजातील सर्व घटकासाठी जे लोक मनापासून प्रबोधन करून समाज समतोल राखण्यासाठी प्रयत्न करतात अशांचा सन्मान करणे, मदत करणे आमच्या संस्थेचे आद्य कर्तव्य आहे आणि आपण सर्वांनी मुंबई वरून येऊन आजच्या शुभदिनी हा सन्मान स्वीकारला त्यांबद्दल देखील आभार मानले.याप्रसंगी कलाकरांचे उपस्थितीत सत्यशोधीका आशा ढोक यांचा वाढदिवस असल्याने केक कापून आनंद साजरा करीत हम सब एक है ! अशा घोषणा दिल्या..
शेवटी आभार आकाश -क्षितिज ढोक यांनी मांनले.