लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्ह्यात औद्योगिक शहर म्हणून नावलौकिक असलेल्या शहरात सुसज्ज बसस्थानक नाही आणि यावर आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला नाही ही लज्जास्पद बाब असल्याची खेद व निषेध वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी नोंदविला. फुसे यांच्या नेतृत्वात गडचांदूर येथे सर्वसोयीयुक्त बस स्थानक उभारण्यात यावे यासाठी गडचांदूर नगर परिषदेचे मूख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राजूरा उपविभागातील सर्वात औद्योगिक व चार सिमेंट कंपनी आजू बाजूला असल्याने मोठया प्रमाणात प्रवाश्यांची रहदारी असते.
2014 मध्ये गडचांदूर नगर परिषदेची स्थापना झाली मात्र आजतागायत गडचांदूरला कायमस्वरूपी बसस्थानक नाही.
दररोज शेकडो प्रवासी ऊन आणि पावसात रस्त्यावर उभे असतात. मुलभूत सुविधा आणि कायमस्वरूपी बसस्थानकाअभावी विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवाशांवर घोर अन्याय होत आहे करिता सर्व सुविधांनी युक्त कायमस्वरूपी बसस्थानक त्वरित बांधावे अशी मागणी मूख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.सदर निवेदन प्रशासकीय अधिकारी शेडमाके यांनी स्वीकारले,
वरील प्रश्नावर सकारात्मक उत्तर व लेखी आश्वासन न मिळाल्यास गडचांदूर येथे तीव्र आंदोलन करू असा ईशारा ही यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहूजन आघाडी चे तालूका महासचिव राजेंद्र नळे, महेंद्र ठाकूर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.