मधुगंधा जुलमे चा महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार. ♦️एमपीएससी कृषी विभागात महाराष्ट्रातून मधुगंधा आली प्रथम.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– मधुगंधा पुष्पवर्षा गौतम जुलमे, राहणार जवाहर नगर वार्ड, राजुरा ही एमपीएससी कृषी विभागाच्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम आली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तीने राजुरा चे नाव महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उंचावून यशोशिखर गाठले. तिच्या या यशाबद्दल राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने तिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तीचा व तीच्या आई वडीलांचा गौरव करण्यात आला. महिला काँग्रेसच्या वतीने शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन तीचा सत्कार करण्यात आला. मधुगंधा जुलमे हिचे प्राथमिक शिक्षण इन्फंट कॉन्व्हेंट राजुरा येथे पुर्ण झाले असून सुरुवाती पासूनच ती अभ्यासात हुशार आहे. आपल्या प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर तीने हे यश मिळविले आहे. तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी नगरसेविका वज्रमाला बतकमवार, ज्योतीताई शेंडे, इंदूलाई निकोडे, सुप्रिया गेडाम, विनाताई गोप, उज्वला कातकर, शिल्पा नगराळे, पूनम गिरसावळे यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here