इन्फंट च्या विद्यार्थ्यांनी जानली तहसील कार्यालयाची कार्यप्रणाली.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथिल इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय राजुरा येथे भेट देऊन तहसिल कार्यालयाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, त्यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या कोण कोणत्या योजना चालतात तसेच तहसिल कार्यालयाचे तालुका स्तरावर प्रमुख अधिकारी असतात अशा विविध विषयांची माहीती जाणून घेतली.
या प्रसंगी तहसिलदार हरिष गाडे, नायब तहसिलदार अतुल गांगुर्डे, संजय चिंगलवार, अन्न पुरवठा निरीक्षक सविता गंभीरे, इन्फंट कॉन्व्हेंट चे शिक्षक उमेश लढी, सुभाष पिंपळकर, नसिम शेख यासह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here