,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन बुलढाणा 👉( जि प्र)प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्री शिवाजी महाविद्यालय बुलढाणा येथे फिल्म सोसायटी व वाडेकर फिल्म सोसायटी यांच्या वतीने प्रमुख पाहुणे रफिक कुरेशी , सेंसर बोर्ड चे मुंबईचे सदस्य विनोद डावरे पाटील,अभिनेता मोहन काळे, भास्कर वाडेकर संस्थापक-अध्यक्ष आणि अशोक सूर्यवंशी (अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महाराष्ट्र राज्य संघटक, गुरुजी,कृष्णनिती या चित्रपटाचे कार्यकारी प्रोडूसर,अभिनेता) राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले विविध क्षेत्रातील कला क्रीडा,संस्कृती सामाजिक,डॉक्टर, वकील, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रीय पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे .राजश्री महेशकर, बेबिजान पठाण, रवींद्र शिंदे शशिकला गुंजाळ,सुरेखा डोगरदिवे, बाळासाहेब गोतारणे, संध्याराणी कोल्हे,विजय खंडागळे या सर्वांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना बुलढाणा फिल्म सोसायटीने 30 वर्षाची परंपरा बुलढाणा फिल्म सोसायटीने आम्हा सर्वांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आम्ही बुलढाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर साहेब यांचे मनपूर्वक आभारी आहे तसेच त्याने ही परंपरा पुढे चालू ठेवावी अशी विनंती पुरस्काराने सन्मानित केलेल्या कलाकारांनी केली,ही परंपरा कायम स्वरूपी चालू ठेवुन बुलढाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर यांनी कलाक्षेत्रातील कलाकारांना व इतर क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय, सामाजिक, कला क्रीडा शैक्षणिक डॉक्टर,वकील अशा विविध क्षेत्रातील लोकांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे,या पुरस्कार सोहळ्याघे संयोजन सुरज वाडेकर संचालक प्रेम कुमार इंगळे यांनी केले तसेच भास्कर वाडेकर यांनी अवर एन्व्हारमेंट या चित्रपटाचने महाराष्ट्र बरोबरच परराष्ट्रात पारितोषिक स्पर्धे मध्ये मिळवल्या बद्दल सुरज वाडेकर यांचं अभिनंदन व कौतुक केले आणि सावित्रीबाई फुले हा चित्रपट प्रत्येक राष्ट्रात जाऊन फेस्टिवल मध्ये बक्षीस मिळवत आहे त्याची बातमी पेपरच्या आली आहे त्या बातमीच्या अंकाचे वितरन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले आणि बुलढाणा फिल्म सोसायटी च्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यात संघटक अशोक सुर्यवंशी म्हणाले सावित्रीबाई फुले हा चित्रपट परदेशामध्ये जाऊन फिल्म फेस्टिवल मध्ये अवार्ड पुरस्कार बक्षिस मिळू शकतो असे चित्रपट मराठी निर्मात्यांनी बनवून आपला चित्रपट चांगला कसा चालेल व चित्रपट गृह मध्ये हाउसफुल कसा होईल हे मराठी चित्रपट निर्मात्यांना सुचविले , मराठी चित्रपट ला लागलेली गळती थांबवण्यासाठी संघटक म्हणाले सर्व मराठी चित्रपट निर्मात्याने एकत्र येऊन चांगल्या कथेचे विचार मांडून मराठी चित्रपटांची चांगली निर्मिती करावी असे चित्रपट हाऊसफुल चित्रपटगृहात चालले पाहिजे असे मराठी चित्रपट सर्व मराठी चित्रपट निर्मात्याने बनवावे सर्वांनी मराठी चित्रपटाला दर्जा देऊन मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहून मराठी चित्रपट निर्मात्यांना जास्तीत जास्त भरभराटीचे यश लाभावे आणि चांगली कथा निर्मिती मध्ये उतरून निर्मात्याने आपला चित्रपट चांगला कसा होईल व प्रेक्षकांना कसा आकर्षक व पब्लिक कसं चित्रपट कर थेटर मध्ये गर्दी कशील हाईल चित्रपट ग्रह कसा हाउसफुल होतील हा विषय मानताना शासनाकडून जास्तीत जास्त निर्मात्यांना अनुदान मिळावे ही विनंती करण्यात आली तसेच मराठी चित्रपटांना लागलेली गळती थांबवण्यासाठी शासनाने मराठी चित्रपट निर्मात्यांना लवकरात लवकर अनुदान व जास्तीत जास्त निर्मात्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि चित्रपट गृहात मराठी चित्रपटांना प्राधान्य द्यावे तरच पुढे मराठी चित्रपट निर्मितीसाठी निर्माते निर्मिती करण्यास उत्सुक राहतील आपल्या चित्रपटाचा चांगला दर्जा वाढवून एक चांगली गोष्ट घेऊन चांगला चित्रपट कसा होईल आणि ते प्रेक्षकांना कसा आवडे थेटरला गर्दी कशी करतील हे निर्मात्यानी दखल घ्यावी तरच भविष्यात आपले चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपट टिकून राहतील आणि आपले चित्रपट शासनाने पाहून खरोखर मराठी चित्रपट चांगले बनत आहेत व त्यांना शासनाने प्राधान्य दिले पाहिजे हे विचार शासनाच्या मनात येऊन मराठी चित्रपटांना एक चांगला दर्जा द्यावा व अनुदान उपलब्ध करावे ,महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय शिंदे शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत व मराठी चित्रपटाचे ऑडीओ, व्हीडिओ फिल्मी बाझार मध्ये चॅनेलच्या लोकांना समोरा समोर निर्मात्यांना चांगली रक्कम मिळवुन देण्यासाठी दोघांना समोर बोलवुन चर्चा घडवुन देत आहे आणि काही महीण्याच्या व वर्षाच्या मुदतीवर हक्क निर्माता महामंडळ यांच्या कडुन निर्मात्यांना चांगले पैसे मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि सॅटेलाईट ,चॅनेलला मराठी चित्रपटांची विक्री चांगल्या किमतीत विकले जावे यासाठी सॅटेलाईट व निर्मात्यांची चर्चा निर्माता महामंडळ करत आहे तरच भविष्यात मराठी निर्माते परत जोमाने चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उतरतील आणि निर्माता महामंडळ वेळोवेळी निर्मात्यांचे वर्क शाॅप घेऊन सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांना एकत्र करत आहे असे संघटक अशोक सुर्यवंशी यांनी संबोधीले ,