रोटरी क्लब राजुराच्या वतीने बसस्थानक येथे सरबत वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून सूर्य आग ओकत आहे. तापमान उच्चांक गाठित आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा या उद्देशाने रोटरी क्लब राजुराच्या वतीने राजुरा बसस्थानक परिसरात सरबत वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. उन्हामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना थोडी शांतता मिळावी या उद्देशाने रोटरी क्लब राजूराने जवळपास ५०० ग्लास सरबतचे वितरण करून यात्रेकरू, बस चालक आदिंना दिलासा दिला.
या प्रसंगी सर्वश्री राजुरा रोटरी क्लबचे अध्यक्ष नवल झंवर, सचिव कमल बजाज, डॉ. अमोघ कल्लूरवार, राहुल अवधूत, कवीश्वर खनके, ऋषभ गोठी, सारंग गिरसावळे यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here