लोकदर्शन मुंबई 👉 महेश कदम
ता. महाड, जि. रायगड श्री. क्षेत्र पडवी येथे स्वानंद सुख निवासी श्रीसंत सदगुरु स्वामी तपो. गणेशनाथ महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने परमपुज्य सद्गुरु स्वामी तपो. अरविंदनाथ महाराज, श्री. गणेशनाथ महाराज संस्थान, शेदुरमळई यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे ह्या उत्सव काळात श्रेष्ठ अशा संत सज्जनांच्या वतीने काकड आरती, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिजागर, पारायण, कळश पुजन व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांना होणार आहे. ह्या दैनंदिक कार्यक्रमाची सुरुवात सकाळी कळश पुजन पासुन गुरुवर्य तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते होणार असून प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे, मग ह.भ.प. पांडुरंग महाराज उतेकर, (पोलादपूर) ह्यांचा कीर्तन नंतर पडवी ग्रामस्थ महिला मंडळ तर्फे हरिपाठ, हरिजागर, भजनाचा कार्यक्रम सह शेदुरमळई व वारसगाव ग्रामस्थांकडून जागर होणार आहे. श्रीची महापूजा दिपक साळुंके, कळश पुजन दशरथ साळुंके, विणा पुजन सिताराम साळुंके, ध्वजा रोहन कृष्णा साळुंके ह्यांचा हस्ते होणार आहे, श्री. ज्ञानेश्वरी पारायण दहागाव सत्संग मेळावा कीर्तन, हरिपाठ शेदुरमळई व पडवी महिला मंडळ तसेच बाबु देशमुख तर्फे प्रवचन, ह.भ.प. नामदेव डिगे सर तर्फे कीर्तन व पडवी पठार, गावडी तर्फे जागर होणार आहे. दि: १७ व १८/०४/२३ ह्या दोन दिवसांसाठी सकाळी ५:०० वाजल्यापासून ते रात्री १२:०० पर्यंत हा संपूर्ण दिवसभरात कार्यक्रम होणार असून, मंगळवारी सकाळी ७ ते ९ वाजता दिंडी सोहळा, काळयाचे कीर्तन नंतर दुपारी महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांना लाभणार आहे. ह्या सप्ताहाची सुत्र संचालन ह.भ.प. सिताराम साळुंके व विजय साळुंके करणार आहेत. काकडा, पारायण, हरिपाठ, गायनाचार्य, मृदंगमणी समस्त साळुंके ग्रामस्थ मंडळा तर्फे होणार आहे ह्या संपूर्ण सप्ताह चे अध्यक्ष कॅप्टन शांताराम साळूंके, खजिनदार श्री. सिताराम साळुंके, कृष्णा साळुंके व सेक्रेटरी विष्णु साळूंके, नथु साळुंके, परशुराम साळुंके ह्यांच्या देखरेखीत होणार आहे, तरी ह्या दोन दिवसात संपन्न होणार्या सप्ताहाचा लाभ सर्व भाविक जनतेने घेऊन उपकृत करावे अशी नम्र विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ह्या संपुर्ण हरिनाम सप्ताहाची माहिती श्री. चंद्रकांत साळुंके ह्यांनी दिली आहे.