*विदर्भ  लेखिका साहित्य संमेलन,,ची तयारी अंतिम टप्प्यात*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन अकोला👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

अकोला  दि १८एप्रिल विदर्भात भूतो न भविष्यती अशी एक घटना घडू पहात  आहे… व ती म्हणजे दि.२३ आणि २४ रोजी अकोला येथे संपन्न होत असलेले विदर्भ लेखिकांचे हे साहित्य संमेलन होय.
या साहित्य संमेलनाच्या सुनियोजित  तयारीची आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यात जोरात चर्चा सुरू आहे. या साहित्य संमेलनात विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील लिहिणाऱ्या लेखिकांचा  समावेश आहे.  त्यांच साहित्य जगापुढे आणणे…
याच जाणिवा   प्रकर्षाने या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे आहेत
आणि त्यामुळेच थोड फार लिहिणारी लेखिका.. तिचं दमदार लेखन घेऊन या साहित्य संमेलनात उतरत आहे ..कधी कविता तर कधी कथा.. कधी गझल तर कधी  संवाद.. कधी स्वतःचे अनुभव तर कधी स्वतः चे दमदार सूत्र संचालन  या माध्यमातून स्वतःची साहित्यिक भूमिका उभी करणार आहेत…
त्याही पलीकडे जाऊन ती तिच्या
अंगभूत असलेल्या कलागुणांचा अविष्कार या  मंचावरून  सादर करणार आहे. ज्यात नृत्य, गायन, वेशभूषा, नाट्य, अभिनय, एकपात्री, नक्कल अशा सर्व गोष्टींचा समावेश
राहणार आहे.
विदर्भातील स्त्री म्हणजे मानमर्यादा याचा सन्मान राखत .. उंबरठा सांभाळत
घरात…दारात…. समाजात सर्वत्र वावरताना दिसते…पण ती कुठेतरी केवळ  जगण्याच्या.. प्रश्नांच्या.. गुंत्यात   सापडलेली  हतबल निराश स्त्री…आहे
असे तिचे चित्र उभे केले जाते… परंतु या सर्वांना शह देत आज तिच्यातील
लेखिका दमदारपणे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उभी होणार आहे..
नक्कीच विदर्भात शेती ..माती.. बेरोजगारीशी निगडित अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या प्रश्न तर प्रचंड ऐरणी वर आहे अशा वातावरणामध्ये..जगतांना ..
अनेक प्रश्नांच्या गुंत्यात वैदर्भीय स्त्री सापडलेली आहे… या सर्वांमध्ये तिची अस्मिता कुठे संपत चालली आहे. तिला तिची ती कळायला संधीच मिळत नाही . वेळही मिळत नाही अशा स्त्रियांना तिच्यातली ती कळावी.. याकरता संधी देण्याचे कार्य या विदर्भ लेखिका साहित्य संमेलना च्या माध्यमातून केले जात आहे..नव्हे तर हाच या साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. एकूणच साहित्यांच्या रणधुमाळीत विदर्भातील कानाकोपऱ्यातील लेखिका मागे पडत चाललेली आहे. तिला हात
देण्याचे कार्य व्हावे आणि  तिचे मनोबल वाढावे याकरिता, या साहित्य संमेलनाची बांधणी होणे, ही एक ऐतिहासिक घटना समजली जात आहे… याकरता आर्थिक तसेच शारीरिक पातळीवर कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते..
पण पहिले पाऊल कोण उचलणार..? हा ही एक प्रश्नच होता… एखाद्या साहित्य संमेलनाची उभारणी करणे म्हणजे साध काम नसते.. याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यातल्या त्यात लेखिका या स्त्रिया आहेत.. विखुरलेल्या आहेत.. त्यांना आर्थिक तसेच  अन्य
निर्णय घेण्याचे आजही स्वातंत्र्य आजही नाही… अशा परिस्थितीत मग साहित्य संमेलन कसे उभे होणार..? पैसा कसा उभा करणार ..?आणि विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातल्या लेखिका एकत्र आणण्याकरता कोण पुढे येणार..? असे सारे प्रश्न होते.अशावेळी आयोजनाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर सांभाळण्यात पुढाकार घेतला..
तो विदर्भ लेखिकाच्या अध्यक्ष नागपूर येथील विजया मारोतकर यांनी….! आणि त्यांना पुरेपूर सहकार्य दिले .ते  अकोला  जिल्हा  प्रमुख
देवीकाताई देशमुख  यांनी…!
मराठी गजलेच्या क्षेत्रातील एक नितांत गाजलेले नाव असलेल्या अकोल्याच्या देविकाताई देशमुख यांना लेखिकांच्या लेखनाप्रती प्रती अपार प्रेम वाटते…
विदर्भात मराठी टिकून राहावी,याचा प्रयास त्या रजधूळ  मासिकाच्या  माध्यमातुन  करीत असतात.  त्यांनी आतापर्यंत 35 च्या वर साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी सहजच  निमंत्रक भूमिका  स्विकारली आणि सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. विजयाताई माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान च्या अध्यक्ष आहेत. या प्रतिष्ठानने अल्पावधीतच मराठीच्या क्षेत्रात दमदार ठसा उमटवला आहे. याआधीही साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले असल्यामुळे या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. देविकाताई आणि विजयाताई  या दोन्ही दोन दमदार लेखिकांच्या समन्वयातून
चमत्कार घडून आला. अकोला ते नागपूर अंतर कधीच कळून पडले आणि ऐका  नितांत सुरेख साहित्य संमेलना च्या आयोजक  कामाला  लाग ल्या..संमेलन उभे करायला सुरुवात केली .. संमेलन अध्यक्षांपासून आणि त्यानंतर एक एक पायरी चढत गेल्या, कुठेही नकार मिळालाच नाही.. त्यामुळे साहित्य संमेलना ला संवेदन शील  मनाच्या प्रख्यात  साहित्यिक
डॉ. शोभाताई रोकडे या  संमेलनाध्यक्ष म्हणून लाभल्या. विदर्भातील साहित्य समर्थक अशी ओळख असलेल्या
डॉ.मनीषा  यमसनवार ह्या
उद्घाटक म्हणून लाभल्या.तन मन धनाने उभे  राहण्याचे  मान्य  केले.
स्वागताध्यक्षाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश संघर्ष संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे यांनी  स्वयंप्रेरणेने
स्वीकारली. मूठ बांधल्या गेली…
आणि साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली…नंतर पुढे बांधणीची वज्रमुठ कशी तयार झाली कळलेच
नाही.
संमेलन होऊ शकते ..ही वार्ता सर्व विदर्भ  लेखिकां मध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण  करणारी
ठरली आणि प्रत्येकीने आपापल्या परीने सहकार्य देत उतरण्याचे ठरवले आणि ठरवलेच नाही तर ते वास्तवात
उतरविले.
सर्वच लेखिकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सहकार्यातून याचे नियोजन करण्यात आले.या संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकच लेखिकेला मंचावर सहभाग हा मिळालाच पाहिजे .याची काटेकोर दखल घेण्यात आली .दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात त्यांच्या राहण्याची ..भोजनाची  व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट सादरीकरणा करता प्राप्त होणारी कौतुकाची थाप.. सर्व लेखिकांना जणू माहेरपणाची जाणीव भासेल…  आनंदी वातावरणात संमेलन पार पडाव…याकरता सर्व जिल्ह्यातील लेखिका दक्ष आहेतच परंतु प्रत्यक्ष स्थानिक  लोकांचे  सहकार्य  महत्वाचे  असते. जे  लाभत  आहे.. देवीकाताई
देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेतील सहकारी देता येईल तेवढे सहकार्य देऊन कार्यरत आहे.. विविध वृत्तपत्रां चे  पत्रकार तसेच  इलेक्ट्रिक
मीडिया यांचे तसेच  समाजाच्या सर्व स्तरातील साहित्यप्रेमीचे सहकार्य  लाभत  आहे. सर्वांच्या शुभेच्छा आणि सहकार्य या साहित्य संमेलनाला ज्या पद्धतीने  लाभत आहे..त्या  पाहता
हे साहित्य संमेलन नितांत उंचीवर जाईल  याचि खात्री आहे..
साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्वच्या सर्व लेखिका या संपूर्ण वेळ साहित्य संमेलनात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मंचावर होणाऱ्या सादरीकरणाला भरपूर दाद मिळणार आहे ..जी प्रत्येक सादरीकरण  करणार्‍यांना अपेक्षित असते..जे  येथे  होणार आहे. याचे सारेच्या सारे श्रेय हे विजया मारोतकर आणि देविकाताई देशमुख यांना जाते ,हे नाकारून कसे बरे चालणार..?
आता प्रतीक्षा आहे .. ती फक्त हे
संमेलन साकार होण्याची
….. अर्थात ते उत्तमच होणार ….याकरता आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *