लोकदर्शन 👉 किरण कांबळे
*विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या भिमजयंती निमित्त तक्षशिला सेवा संघ मित्र मंडळ सातारारोड पाडळी या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दि 14 एप्रिल रोजी सातारारोड स्टेशन येथुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली..! तक्षशिला सेवा संघ मित्र मंडळाकडून जयंती निमित्त प्रबोधन सम्मेलनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक मा.चेतन आवडे (प्रदेश महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ऍड तेजस माने सर (जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा सातारा) मनोगत व्यक्त म्हणाले की शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश दिला विशेष मार्गदर्शन उपस्थिती मा.सतीश गायकवाड सर (जिल्हाध्यक्ष प्रोटाॅन सातारा) प्रबोधन सम्मेलन कार्यक्रमाची अध्यक्षता मा.इंजि.तुषार मोतलिंग सर (राज्य कार्यकारिणी सदस्य बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश) यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संघटीत शक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुन्हा नव्याने उभी करा आणि सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही संकट समोर आले तरी सर्वांनी एकत्र येऊन त्या संकटावर मात करा..! कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.श्रीकांत आवडे अध्यक्ष तक्षशिला सेवा संघ मित्र मंडळ सातारारोड पाडळी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करण्यासाठी तरुण मुलांनी पुढे येऊन काम करावे आणि यासाठी संकल्प करावा तेव्हाच खरेखुरे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन ठरेल..!*
*कार्यक्रमाचे संयोजक :- अमोल आवडे (उपाध्यक्ष तक्षशिला सेवा संघ मित्र मंडळ सातारारोड पाडळी) सदस्य महेश आवडे, प्रज्वल आवडे, संदीप आवडे,हिरक आवडे, प्रदिप आवडे,साहिल आवडे, ऋषिकेश बनसोडे, प्रमोद काळे, सिध्दांत आवडे इ. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम नियोजन केले..!*