लोकदर्शन 👉राहुल खरात
फुले आंबेडकर जयंती एक दिवसाची नसून रोज साजरी करा तरच आपल्या घरात ज्ञानसूर्य तयार होतील – सत्यशोधक रघुनाथ ढोक
बिदाल – दरवर्षी प्रमाणे भीमशक्ती तरुण मंडळाने दि. 14 एप्रिल 2023 रोजी भव्य दिव्य रॅली चे आयोजन करून थोरसमजसुधारक महात्मा फुले यांची 196 वी आणि विश्वरत्न डॉ.आंबेडकर यांची 132 वी जयंती निम्मित त्यांच्या अर्ध पुळ्याची सोबत सावित्रीबाई फुले यांची मान्यवरांचे शुभहस्ते अर्ध पुतळ्यास पुष्पहार घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीचे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक पुतळा चौक येथे सभेत रूपांतर करून फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार भीमशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी यांचे समवेत घालण्यात आला.या रॅली चे नेतृत्व महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्यशोधक ढोक यांनी केल्याने रंगत आली होती सत्यशोधक ढोक मार्गदर्शन करताना म्हणाले की फुले आंबेडकर जयंती एक दिवसाची नसून रोज साजरी केली तरच आपल्या घरात ज्ञानसूर्य तयार होतील . त्यासाठी मुलांना उच्चशिक्षित केले पाहिजे सोबत फुले आंबेडकर यांचे साहित्य वाचण्यास सांगितले तर ते कुटुंबाचा ,समाजाचा देखील उद्धार करतील. ढोक पुढे म्हणाले की आपण आता विज्ञान युगात वावरत असून आपणास सत्य काय आहे याची जाण असल्याने अंधश्रद्धा,कर्मकांड याला तिलांजली देण्याची खूप आवश्यकता असून आर्थिक उधळपट्टी न करिता सत्यशोधक पद्धतीने आपले कार्य पार पाडावीत असे आवाहन देखील त्यांनी केले.
या रॅली चे प्रसंगी बिदाल गावचे सरपंच पैलवान प्रमोद जगदाळे,सदस्य आरती विजय खरात,प्रमोद ढोक,विशाल मदने, माजी सरपंच सुरेखा पोपत खरात, उपस्थित होते.तर मिरवणुकीचे आयोजन विजय खरात,जालिंदर खरात,सुनील कांबळे, बली खरात,दगडु ढोक यांनी केले तर प्रा.जितेंद्र खरात यांनी सूत्रसंचालन व सुसूत्रता करून सर्व महापूर्षांचे नावाने जयघोष करून परिसर धुमधुमुन सोडला होता तर महिलांनी चौकात फुगड्या खेळून , नाचून व लहान मुलामुलींनी देखील नाचून आनंद साजरा केला.मिरवणुकीचे आगोदर पावसाने देखील दमदार हजेरी लावून सहभाग नोंदविल्याने भर उन्हाळ्यात वातावरण थंड
ठेवण्यास मदत केली.