लोकदर्शन पवनी 👉अशोक गिरी
पवनी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी.जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित मराठी व इंग्रजी भाषांमध्ये भाषणे दिली व बाबासाहेब यांच्या विषयी आदर व्यक्त करीत त्यांचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प केला.निवडक विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांअंतर्गत विविध प्रकारची सामुहिक व वैयक्तिक नृत्य व गित गायन करुन उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील शिक्षक पी.डी.भोयर तसेच सामाजिक कार्यकर्ता धनराज सेलोकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात बाबासाहेबा आदर्श समोर ठेवून आत्मविश्वास निर्माण करुन अभ्यास करावा असे आवाहन केले.शेवटी शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत करुन विजेते विद्यार्थ्यांचा सन्मान केला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक एम.एम.जिवतोडे, सुप्रिया रामटेके,विजुमाला साखरकर,करुना वाघमारे यांनी मोलाचे सहकार्य केले.