समरसता मंचातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समरसता मंच चंद्रपूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समरसता मंचाचे जिल्हा अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैदळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विद्याभारती, विश्व हिंदू परिषद, हेडगेवार सेवा समिती, भारतीय मजदूर संघ ग्राहक मंच, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, धर्म जागरण मंच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध शाखेतर्फे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वसंतराव थोटे, लक्ष्मण ओलालवार, शैलेश पर्वते, विवेक आंबेकर , गणपत सत्रे, सुधीर मिसार, दिवाकर थोटे , राजेंद्र गांधी, अरुण मदनकर, प्रशांत देगंमवार, विश्वास मादमशेट्टीवार, विजय एंगलवर एड.नितीन गाडकीने ,एड. आशिष मुंदडा, डॉ अशोक भालेराव व स्वयंसेवक बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here