लोकदर्शन 👉 सौभा भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे
मो. नं.8530144254
देशसेवेचा घेऊन वसा ,
विश्रांतीचा त्याग केला .
संकटाशी करून सामना,
स्वाभिमान शिकविला.
समता शांतता बबंधुभाव,
जोपासण्याचा धडा दिला.
आकाशातील तारा होऊन,
ज्ञानरूपी प्रकाश दिला.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल महू इंदोर 1891 मध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. आई-भिमाबाई व पहिली पत्नी रमाबाई दुसरी सविता .असा बाबासाहेबचा परिवार.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्याय मंत्री होते. बहुजनांच्या प्रगतीसाठी त्यांनी संपूर्ण जिवणाचा त्याग करून समाजसेवेत झोपून दिले. समाजातील जातीयवादाला मुळासकट उपटून फेकण्यासाठी त्यांनी काळाशी भिडले आणि लढले. शिक्षणाशिवाय देशाचा उद्धार नाही प्रगती नाही हे सत्य त्यांना उमगले तेव्हा तळागाळातील लोकांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी स्वतः एलफिन्सटन हायस्कूल बॉम्बे विश्वविद्यालय या ठिकाणी शिक्षण घेतले अर्थशास्त्र १९१६ मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातून पीएचडी केली , मास्टर ऑफ सायन्स , डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या मिळवल्या .
आंबेडकर हे महार जातीतील असल्यामुळे त्यांच्या आर्थिक मानसिक आणि सामाजिक छळ होत असे त्यांचा समाजासमोर करमठ लोक भेदभाव करत. असत डॉक्टर बाबासाहेब हे दलित असल्यामुळे शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला तरीही न डगमगता कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षा पूर्ण करून स्वतःला सिद्ध केले.
डॉक्टर बाबासाहेबांनी समाजशास्त्र ,इतिहास, दर्शनशास्त्र ,मानवशास्त्र ,विज्ञान शास्त्र ,अर्थशास्त्र ,याचा अभ्यास करून एम ए ची पास्टर डिग्री प्राप्त केली. अस्पृश्य असल्यामुळे नोकरी व्यवसाय करता संघर्ष करावा लागला.
” जातीपातीच्या भेदभावामुळे आता रडायचं नाही लढायचं ,असा निर्णय घेऊन काळाला भिडले .
कित्येकदा अपमान झाला जातीय भेदभावामुळे मानसिकतेचे उग्र रुप धारण केले. मोर्चे काढले संघटित होण्यासाठीआव्हाने केली .जातीयता ही समाजाला लागलेली कीड मुळापासून मारून टाकण्यासाठी लोकांना संघटित करून सभा घेतल्या त्यामध्ये आपले विचार मांडले. बाबासाहेबांनी न्यायालयीन शिक्षण पूर्ण करून वकिलीचे काम सुरू केले न्यायालीन लढा देऊन यश मिळवले.
संघटित होऊन जातीभेद दूर करू
अन्यायावर मात करण्यासाठी एकमेकाचे हात धरू
दलितांच्या अधिकारा करता जोमाने लढायलाला सुरुवात केली. पाण्याचे स्रोत खुले केले जावे, मंदिरात प्रवेश दिला जावा, यासाठी मागणी केली. हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाच्या कडाडून समाचार घेऊन प्रतिकात्मक प्रदर्शन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीचा उद्देश;- जातीय भेदभाव अस्पृश्यता नष्ट करणे
महिलांना अधिकार मिळवून देणे
हा होता .
संविधानला दोन वर्षे 11 महिने सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर संविधानावर अभ्यास करून 26 नोव्हेंबर 1949 ला राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपुर्द केले .
अशा या महान नेत्याचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी झाला.
सावित्री ज्योतीने शिक्षणाचा रचला पाया
रमाईच्या साथीने भीमराव कळस झाले .
दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी ,
देव म्हणून जन्मास आले. शिक्षणातील चमकता तारा
ज्ञानातील कुशलतेचा हिरा.
पुन्हा कधी होणे नाही .
लिहून देशाचे संविधान ,
कायद्याचे अभ्यासक झाले.
विविध क्रांत्या करून ,
भीम जनतेचा वाली झाले .
अशा या नेत्याला माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन.
सौभा भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे
मो. नं.8530144254