लोकदर्शन 👉 मोहन भारती
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचंदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप गुजर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल मेहरकुरे ज्योती चटप हे होते.
याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथीने मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे संचालन तसा प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार राजेश मांढरे यांनी मानले कार्यक्रमासाठी सुरेश पाटील, बावनकर आडे, माधुरी उंमरे ,सुषमा शेंडे , गोपमवार , प्रा. पोडे प्रा. मुप्पीडवार, प्रा. जाहीर, जी एन बोबडे ,मरसकोल्हे किन्नाके ,भालचंद्र कोंगरे, सिताराम पिंपळशेडे,यांचे सह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.