लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात
सांगली दि.११. वंचित बहुजन माथाडी
ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांची मुंबई येथे उपायुक्त म्हणून पदोन्नती झाल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते, त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतुन श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगार व इतर सर्व कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. यामुळे रिक्त असणारे सहाय्यक कामगार आयुक्त हे पद तात्काळ भरावे व कामगारांची होणारी गैरसोय टाळावी या आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्येक्षात भेटून देण्यात आले होते. या मागणीची दखल घेऊन सदर सांगली जिल्हा साठी सहाय्यक कामगार आयुक्त पदी मा.विशाल घोडके साहेब यांची निवड करण्यात आली त्यांनी सोमवार दिनांक १२/४/२०२३ रोजी रितसर पदभार स्वीकारले आहे. त्यांच्या निवडीबद्दल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व कामगारांचे विविध कल्याणकारी योजनांचे थकीत अर्ज तात्काळ पूर्ण करावेत. तसेच कामगारांचे विविध प्रश्न व येणाऱ्या अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यावेळी मा. सहाय्यक कामगार आयुक्त मा.विशाल घोडके यांनी थकीत, प्रलंबीत, असणारे कामगारांचे विविध प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी कामाचा आराखडा आखून मंजूर लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, महापालिका क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला,मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार, विक्रांत सादरे, जावेद आलासे, संदिप कांबळे,बंदेनवाज राजरतन,मराप्पा राजरतन,संगाप्पा शिंदे,आदी उपस्थित होते.