लोकदर्शन मांडकी,चिपळूण👉 -सत्यवान तेटांबे
नुकताच हनुमान सेवा मंडळ, मांडकी येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा चिपळूण, संगमेश्वर चे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शेखर गोविंदराव निकम, ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, उद्योगपती दिलीप तेटांबे, उद्योगपती विनायक वासुदेव वडकर, दत्ताराम तुकाराम निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मांडकी गावातील प्रसिद्ध कुस्तीगीर महादेव तेटांबे यांच्या वडिलांनी म्हणजे कै. तात्या तेटांबे यांनी 200 वर्षांपूर्वी या श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करून ग्रामस्थांना मंदिर उपलब्ध करून दिले. पुढे या मंदिरात अनेक उत्सव समारंभपूर्वक साजरे होऊ लागले. याच वास्तूत मांडकी ग्रामस्थ तसेच इतर गावातून अनेक हनुमान भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
हा हनुमान जन्मोत्सव सोहळा यशस्वी व्हावा म्हणून सर्वश्री विनायक वासुदेव वडकर, दत्ताराम तुकाराम निकम, चंद्रशेखर अनंत पाणिन्द्रे, दिलीप परशुराम तेटांबे यांनी आर्थिक सहकार्य करून आलेल्या भाविकांना दोन दिवस अन्नप्रसाद देण्याची व्यवस्था केली.
आर्थिक सहकार्य मिळविण्याकरिता सर्वश्री ओमप्रकाश भंडारी, दत्तात्रय हडदे, शिवराम भंडारी, संजय तेटांबे यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री सत्यवान तेटांबे आणि समाजसेवक श्री गणपत भंडारी यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी स्थानिक भाविकांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री उत्तम तेटांबे, गणेश पाणिन्द्रे, महेंद्र तेटांबे, विश्वनाथ तेटांबे, संतोष तेटांबे, विजय तेटांबे, राजू तेटांबे, मनोज तेटांबे, दत्ता तेटांबे, जितेंद्र तेटांबे, नितीन तेटांबे, उमेश शिर्के, त्याचप्रमाणे मांडकी हनुमान सेवा महिला मंडळ आणि समस्त तेटांबे, भंडारी आदी सर्व मांडकीकरांनी विशेष परिश्रम घेतले. सुधीर लक्ष्मण तेटांबे यांनी दोन दिवसीय सुरु असलेल्या या भाविक सोहळ्याचे आपल्या रसाळ वाणीने सूत्रसंचालन करून उपस्थित भाविकांची मने जिंकून घेतली. अशा तऱ्हेने मांडकी हनुमान सेवा मंडळाचा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला.