by : Ajay Gayakwad
वाशिम / मालेगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मालेगांव शहरात जय्यत तयारी सुरू 14 एप्रिल शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे जयंती उत्सवासाठी मालेगांव बाजारपेठ मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले टी शर्ट,झेंडे,मफलर,टोपी,शेले,आदी बाजारात दाखल झाले असून,खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे
विविध परिसरातील आंबेडकर जयंती उत्सव सम्राट नवयुवक मंडळ , पंचशील नवयुवक मंडळ,भिम शक्ती नवयुवक मंडळ समितीतर्फे गांधीनगर तहसील कार्यालयासमोर नवीन बसस्थानकाजवळ आंबेडकर पुतळ्यापर्यंत मिरवणूक बाजारात आलेले टी शर्ट,झेंडे यांना शहरातील आंबेडकरी जनतेमधून प्रचंड मागणी असून,यंदा दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले शहरातील आठवडी बाजार गांधी चौक चौकासह मार्केट परिसरात झेंडे, मफलर विक्रेत्यांचे स्टॉल सजले असून,पंचरंगी झेंडे, ओढणी,आंबेडकर यांचे चित्र असलेले टी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत दुचाकी,रिक्षावर युवकांनी निळे झेंडे लावत शहरात वातावरणनिर्मितीला प्रारंभ करण्यात आला आहे.