लोकदर्शन ÷ मोहन भारती
राजुरा :– आज दि. ९ एप्रिल २०२३ रोजी एकता मंच राजुरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले प्रेमींच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम- २०००, द्वितीय – १५००, तृतीय – १००० आणि प्रोत्साहनपर प्रत्येकी – २०० रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्कार ठेवण्यात आले. या सर्व पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी संविधान चौक राजुरा येथे करण्यात येणार आहे.
यासाठी राजुरा शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर आयोजन समितीच्या वतीने नियुक्त केलेल्या परीक्षकांनी काम पाहिले. यात इन्फंट जिजसं इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे ऍड. चंद्रशेखर चांदेकर, सुमेध, गौतम चोरे, मेघाताई बोरकर, अर्चना निमसरकार, सोनिया गांधी कॉन्व्हेन्ट राजुरा येथे संध्याताई चांदेकर, प्रणाली ताकसांडे, मालाबई तामगडगे, वाय. डी. कॉलेज राजुरा येथे सिद्धार्थ नळे, गौतम के. देवगडे, गोपिकाबाई सांगडा विद्यालय राजुरा येथे मार्शल विवेक बक्षी, प्रिया कांबळे, बाळू गौतम देवगडे या सर्व परीक्षक अर्थात बौध्द उपासक उपासिकांसह अनेकांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती, शाळा प्रशासन व विद्यार्थी, पालक वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थीनी सहभाग घेतला.