by : Shankar Tadas
: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भारतीय सिमेंट मजदुर संघाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.
प्रामुख्याने दालमिया सिमेंट कंपनीतील कामगारांच्या वेतनात वेज बोर्डनुसार वाढ करण्यात यावी, पूर्व मुरली कामगारांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावे,दालमिया सिमेंट कंपनीच्या परिसरातील उर्वरित स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा,तसेच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पूर्व मुरली कामगारांचे १२ कोटी ८६ लक्ष वेतन थकित आहे तेसुद्धा कंपनी प्रशासनाने द्यावे अशी मागणी भारतीय सिमेंट मजदुर संघ,दालमिया सिमेंट कंपनी नारंडा यांचेतर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,रमेश वेट्टी,राजू गोहणे,सुनील टोंगे,अक्षय भोस्कर, पारस वाढई, सुरेश गाडगे,बंडू हेकाड,बालाजी शिंदे, शंकर कोरांगे,संदीप मडावी उपस्थित होते.
#दालमिया सिमेंट कंपनी