लोकदर्शन धुळे ;👉राहुल खरात
श्री.भा.ही.शा.वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे…अवयवदान जनजागृती अभियानात रांगोळी,पोस्टर प्रदर्शन पथनाट्य या कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून मोनिका ताई यांनी आपला सहभाग नोंदवीला. सदर कार्यक्रमात मुक्ता आदिवासी बहुुद्देशिय संथ्येच्या अध्यक्षा श्रीमती.मोनिकाताई शिंपी यांनी अवयवदाना संबंधी जनजागृती साठी 40 किलो रांगोळी उपलब्ध करून दिली , श्री.अभय् पिंपळे.समाजसेवा अधिक्षक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदवीला. मोनिकाताई यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे पी.एस.एम विभागा द्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अधिष्ठता श्री.अरुण मोरे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिक्षक श्री.मुक्रम खान सर होते.तसेच इतर विभाग प्रमुख होते. या प्रसंगी सूत्रसंचालन पी.एस.एम विभाग प्रमुख श्रीमती सारिका पाटील मॅडम यांनी केले.कार्यक्रमात अवयवदान जनजागृती साठी प्रीतीज्ञेंचे वाचन करून अवयवदाना संभंधी शपथ घ्येण्यात आली.तसेंच पथनाट्या,रांगोळी स्पर्धा,पथनाट्या,पोस्टर प्रदर्शनाच्ये उदघाटन मान्यवरान कडून करण्यात आले.