लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कार्यरत असलेले एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक भगवंतराव डोईफोडे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम येथील वंजारी समाज संघटनेच्या वतीने नुकताच घेण्यात आला त्यांनी अविरतपणे महाविद्यालयाला 33 वर्षपेक्षा जास्त अखंड सेवा दिली सोबतच त्यांनी सामाजिकता जोपासून वंजारी समाजाचे दैवत असलेले राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत भगवान बाबांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम जसे की रुग्णांना फळ वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजूंना मदत अशा पद्धतीचे कार्यक्रम हाती घेऊन त्यांनी सामाजिकता जोपासली तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीच्या सामाजिक उपक्रमांचा आयोजन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले होते त्यांच्या या संपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी सकल वंजारी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार गडचांदूर येथे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तसेच सौ प्रभा डोईफोडे यांचा साडी,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला , यावेळी समाजाच्या मार्गदर्शक व जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती सौ गोदावरी सुरेश केंद्रे व संजय गांधी निराधार योजना चे जिवती तालुका अध्यक्ष सुरेश केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉक्टर माधवराव केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षक पतसंस्था गडचांदूर येथे नव्याने नियुक्त झालेले संचालक काकासाहेब नागरे यांचा देखील सत्कार करण्यात आला, याप्रसंगी अशोक डोईफोडे यांचे वडील भगवंतराव डोईफोडे (सेवानिवृत्त तहसीलदार )तसेच गजानन डोईफोडे (सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी )सौ तारा डोईफोडे,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, विष्णू बडे, कृष्णा गरजे, ज्ञानेश्वर बुधवंत ,भगवान नागरगोजे, रामकृष्ण नागरगोजे ,केंद्रप्रमुख पंढरी मुसळे ,परशुराम मुसळे, संजय केंद्रे,सुहास डोईफोडे, आणि समाज बांधव सहपरिवार सह मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार लक्ष्मण मिसाळ यांनी मानले.