लोकदर्शन 👉.राहुल खरात
अकलूज /माळवाडी – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने नुकतेच 2 एप्रिल 2023 रोजी अकलूज माळवाडी या ठिकाणी अक्षय सुनील खिलारे व प्रतीका प्रकाश एकतपुरे यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक साखरपुडा प्रकाश नामदेव एकतपुरे , माळवाडी यांच्या निवासस्थानी संपन्न झाला हा साखरपुडा या संस्थेच्या वतीने प्रथमच सत्यशोधक पद्धतीने विधीकर्ते व मुलाचे मामा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पार पाडला त्याचप्रमाणे प्रतीका व अक्षय यांचा लवकरच संस्थेच्या वतीने सत्यशोधक विवाह अकलूज या ठिकाणी पहिलाच संपन्न होणार आहे असे यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले.पुढे ढोक म्हणाले की गेल्या 4 वर्षात संस्थेच्या वतीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात मोफत 39 सत्यशोधक विवाह लावलेले आहेत आणि लवकरच 40 वा.सत्यशोधक विवाह सिन्नर या ठिकाणी गोविंद माळी यांचे भाचीचे 1 मे 23 रोजी होणार असून त्यांचे घरातील मुलीचे नुकतेच मुलाचे , जावयाचे भावाचे असे घरात 4 वा.सत्यशोधक विवाह होणार असल्याचे आणि 9 एप्रिल 23 ला राजस्थान कोठ्पुटली या गावी प्रथमच फुले जयंती साजरी करणार असल्याचे सांगत मी देखील स्वतःच्या रौप्य महोत्सवी लग्न वाढदिवसानिमित्त सत्यशोधक पद्धतीने पुन्हा लग्न करून समाजाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि आज माझे घरात भाच्याचा लग्न सुपारी फोडतानाच सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा पार पडून सत्यशोधक विवाह करण्यासाठी दोन्ही कुटुंबाने संमत्ती दिली ही माझ्या आज पर्यंत करीत असलेल्या सत्यशोधक कार्याची पावती आहे असे सागून सर्व आप्तेष्टांच्या ढोक यांनी संस्थेच्या वतीने आभार मानत एकतपुरे यांची सूकन्या सून व मुलगी म्हणून घरात मिळाली याचा खूप आनंद झाल्याचे देखील सांगितले.
या कार्यक्रमाचे सुरुवातीला मुलीची आई वडील प्रतीक्षा व प्रकाश एकतपुरे यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांच्याकडून महात्मा फुले रचित सत्याचा अखंड ढोक यांनी गाऊन घेतला. त्यानंतर वधू-वरांनी सर्व महापूर्शांचे नावाने वंदन करीत आई वडिल ,नातेवाईकांची व देशसेवा करीत समाजहिताचे देखील काम करणार अशी पार्थना दोघानी म्हटली. तसेच वधू वर यांनी एकमेकांना अंगठी बोटामधे घातली. विधीकर्ते मामा मामी सत्यशोधक रघुनाथ व आशा ढोक यांनी वधूवरांना फुले दाम्पत्य यांची फोटो फ्रेम भेट देऊन एकत्रित शाल पांघरून सन्मानीत केले. त्यानंतर पानसुपारी व महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ महात्मा फुले यांच्या 196 व्या. जयंती व सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भेट देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मोलाची मदत सौ.शिला भुजबळ,सौ.लता उबडे प्रणित प्रकाश एकतपुरे,क्षितिज ढोक, मुलाचे चुलते शेखर खिलारे नितीन लिंगे,सुनील पिसे, यांनी मोलाची मदत केली.