माणिकगड स्कूल,गडचांदूर चा माजी विध्यार्थी अभिजित कराळे यांना संशोधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार…

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
………………………
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल गडचांदूर (सध्याची आदित्य बिर्ला स्कुल,गडचांदूर)मध्ये तिसरी ते दहावी पर्यंत शिक्षण घेऊन, पुढे एम, एस सी,. बोयोटेकनलॉजी शिक्षण घेऊन सिरम, इन्स्टिट्यूट पुणे येथे मॅनेजर या पदावर कार्यरत असलेले अभिजित जगन्नाथराव कराळे यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मान्यवर संशोधकांच्या हस्ते प्राप्त झाला.
कोपरगाव येथिल संजीवनी कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात शाश्वत विकासासाठी जैवतंत्रज्ञान शाखेतील संशोधनातील नाविन्यता,आव्हाने,व पद्धती या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती,कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी संजीवनी ग्रुप चे अध्यक्ष नितीन कोल्हे होते,उद्घाटन लोकमत चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांच्या हस्ते करण्यात आले,
प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी चे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे,नीला फरझाना,(बांगलादेश),डॉ ए एम देशमुख,डॉ मोनल मोस्तफा( इजिप्त)डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे,डी एन सांगळे,प्राचार्य डॉ एस बी दहिकर,डॉ एम बी गवळी,डॉ सरिता भुतडा व्यासपीठावर उपस्थित होत्या,नितीन कोल्हे म्हणाले की,सजीवसृष्टी सह वनस्पती,शेती यावर जेव्हा संकटे येतात तेव्हा जैवतंत्रज्ञान मधून पर्याय मिळतो, शाश्वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे ,याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जैवतंत्रज्ञान चे महत्त्व पटवून दिले,
अभिजित कराळे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल
त्यांचे अभिनंदन तत्कालीन माणिकगड स्कुल चे प्राचार्य सिंग , सेवा निवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर,व सौ प्रतिभा पाथरीकर, जे. टी. कराळे, प्रा. अशोक डोईफोडे, तसेच सिरम चे संचालक मंडळ, यांनी केले आहे.
सद्या त्यांचे संशोधन कार्य सुरु असून पी. एचडी. लवकरच प्राप्त होणार आहे.अभिजित चे सर्वत्र कौतुक होत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here