*तहसील कार्यालय कोरपना येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा यथोचीत सन्मान.*

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
तहसील कार्यालय कोरपना येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांची महत्वपूर्ण बैठक नायब तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री भगत यांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च ला घेण्यात आली.
यामध्ये मौजा आसन खुर्द यादी भाग क्रमांक-49 येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO श्री.तुकाराम यादव धंदरे यांनी मतदान कार्ड ला आधार कार्ड जोडण्याचे काम उत्कृष्टपणे करून कोरपना तालुक्यातून सर्वात जास्त केल्याबद्दल मा.भगत साहेब नायब तहसीलदार कोरपना यांच्या शुभहस्ते शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
या कामासोबतच नवीन मतदार नोंदणी,मयत, स्थलांतरीत,दुबार वगळणी,अस्पष्ट छायाचित्र ,वोटर स्लिप वाटप,इ व्ही एम-व्ही व्ही पी ए टी जनजागृती मोहीम ,इत्यादी कामामध्येही ते नेहमी अग्रेसर राहून कार्य केलेले आहे.
याप्रसंगी कोरपना तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मा.भगत साहेब,बोधे सर, सिन्नू सर तसेच कोरपना तालुक्यातील सर्व BLO उपस्थित होते.
हा सत्कार झाल्यामुळे त्यांच्या सहकार्याकडून ,मित्रपरिवार,नातेवाईक,मंडळी,वरिष्ठाकडून अभिनंदन केले जात आहे.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here