*फुले एज्युकेशन तर्फे भूषण बधे सन्मानित*

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

वडगांव – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्यां बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रामध्ये दि.1 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता सत्यशोधक समाज स्थापनादिन शताब्दी शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष व थोरसमाज सुधारक महात्मा फुले यांच्या 196 व्या.जयंती निमित्त दि.1 एप्रिल 23 रोजी समाजसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,हडपसर चे अध्यक्ष भूषण विलास बधे यांचा संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फायबर चा 1 पुटी पुतळा भेट देऊन सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.तसेच आशा ढोक यांचे हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले गीत चरित्र ग्रंथ संच भेट देण्यात आले.
सत्यशोधक ढोक म्हणाले की भूषण यांनी माऊली प्रतिष्ठान ,पुणे चे माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून निस्वार्थी भावनेनी समाजसेवा केली असून विद्यार्थांना शैशनिक मदत देखील करीत असतात. त्यामुळे असे सामजिक कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी संस्थेने हा सन्मान केल्याचे सांगितले. तर वधे यांनी सन्मानास उत्तर देताना म्हंटले की फुले दांपत्यानी 150 वर्षापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जे अलौकिक असे कार्य केले त्याचा वसा घेऊन फुले एज्युकेशन संस्थेने सत्यशोधक विवाह चळवळ महाराष्ट्र व तेलगाना राज्यात नेऊन कार्य केले तो आदर्श देखील आम्ही घेऊन प्रथम लवकरच बधे परिवारात सत्यशोधक विवाह लावून इतरांना देखील प्रेरित करू असे आश्वासन दिले.
आभार क्षितिज ढोक यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *