लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
——————————————–
गडचांदूर–
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राम नवमी कार्यक्रम विविध मंदिरात उत्साहात संपन्न झाला, शहरातील प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात ह भ प दीपक महाराज पुरी यांनी राम कथेचे महत्त्व सांगून उपस्थित लोकांना महत्त्व पटवून दिले तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव मुसळे यांनी राम नवमी कार्याचे सुंदर प्रवचन केले तर सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी उपस्थित लोकांना सामाजिक जीवनात मनुष्याने सुसंस्कारित जीवन जगले पाहिजे हे पटवून दिले यावेळी रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी रामजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम घेण्यात आला ,याप्रसंगी वामन महाराज,कोल्हे महाराज,किसन पांचाळ,सुभाष पिंपळशेंडे,उद्धव पुरी,बंडू पिदूरकर,दशरथ बिडकर,भाऊराव एकरे,श्रीमती रजनी घाईवनकर,श्रीमती राईबाई एकरे आदी मान्यवर उपस्थित होते