लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*पोहरागड,*
.* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोरमाटी समाजाचे श्रद्धास्थान व प्रेरणाकेंद्र पोहरागड संपन्न झाला ऐतिहासिक प्रेरणादायी कार्यक्रम.
बंजारा साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय बंजारा परिषद द्वारा भक्तीधाम पोहरागड येथील बंजारा साहित्य परिषदेत नागपूर येथील आठव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली राठोड यांना सेवाभूमीचे संपादक शंकर आडे द्वारा ऐन वेळेवर संत सेवालाल विचार व कार्य विषयांवर बोलण्याची संधी देण्यात आली होती. अचानक मिळालेल्या संधीला सामोरे जावून आपले विचार तेही इंग्रजी भाषेत मांडण्याची तत्परता दिपाली राठोड यांनी लगेच दाखविली यात्रेच्या गर्दीतच महत्वपूर्ण मुद्दे काढून चालत चालत आपले वडील श्रीपत राठोड यांना सांगत राहीली. यापूर्वी झालेले श्रवण,वाचन व चर्चेच्या बळावर दिपाली राठोड यांनी भव्यदिव्य बंजारा साहित्य परिषदेच्या व्यासपिठांवरुन संत सेवालाल महाराज यांच्या परिवर्तनवादी प्रेरणादायी विचार अतिशय अल्पावधीत मांडण्याचे धाडस सर्वांसाठी स्वाभीमानाचा व कौतुकाचा विषय ठरला. व्यासपिठांवर प्रोत्साहनपर बक्षिसही देण्यात आले. सोबतच सौ. जयश्रीताई राठोड यांनी सादर केलेल्या स्वरचित गीतातून गोरमाटी समाजाच्या गंभीर समस्यांचे मांडलेले विदारक चित्रही सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारे होते.या महत्वपूर्ण बंजारा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय स्तराचे ख्यातनाम साहित्यिक प्रा.दिनेश सेवा राठोड होते. सोबत प्रसिद्ध साहित्यिक भरकाडीकार डॉ. गणेश चव्हाण, नागपूरसह भारतातील विविध राज्यातून आलेले अनेक नामवंत साहित्यिक,कवी, कलाकार यांची मांदीयाळी होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमांचे मुख्य आयोजक प्रायोजक प्रसिद्ध उद्योजक दानशूर किशनराव राठोड आणि त्यांच्या सौ. अलंक्रित राठोड यांच्यासह सामाजिक, राजकिय क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा.विलास राठोड व सेवाभूमीचे संपादक शंकर आडे होते तर कार्यक्रमाचे अप्रतिम संचलन गोर प्रकाश राठोड आणि गोर सज्जन राठोड यांनी केले.
,