,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आशियातील सर्वात मोठी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि बुलढाणा च्या 471 व्या गडचांदूर शाखेचे उदघाटन लोकप्रिय आमदार मा सुभाषभाऊ धोटे यांच्या शुभ हस्ते फीत कापून तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले,
अध्यक्ष स्थानी बुलढाणा अर्बन चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर मा डॉ सुकेशजी झंवर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक विजय बावणे,पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी,नगरसेवक विक्रम येरणे,माजी सरपंच शिवकुमार राठी, गोपाल मालपाणी,लेखा परिक्षक अभय राजंदेकर,होते,याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा बुलढाणा अर्बन च्या वतीने शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,
बुलढाणा अर्बन चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर मा डॉ सुकेशजी झंवर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आदरणीय राधेश्यामजी चांडक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन केवळ बँकिंग क्षेत्रातच नाहीत तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे,1986 साली स्थापन झालेल्या बुलडाणा अर्बन च्या महाराष्ट्र व इतर राज्यात 475 शाखा कार्यान्वित असून एकूण ठेवी 10763 करोड,असून सभासद संख्या 13 ,60,000 आहेत,
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनाची माहिती दिली, उदघाटक आमदार सुभाष धोटे यांनी बुलढाणा अर्बन च्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमात प्रतिष्ठित व्यापारी जसराज धूत, राजेंद्र चांडक,संजय चांडक,जेष्ठ पत्रकार प्रा अशोक डोईफोडे, उद्धव पुरी,गडचांदूर शाखा व्यवस्थापक श्री विष्णू घायाळ,विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तथा गावातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार,उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर चे विभागीय व्यवस्थापक श्री राहुल देशपांडे, यांनी केले,संचालन नासिर खान (चंद्रपूर)यांनी केले तर आभार प्रदर्शन नागपूर चे विभागीय व्यवस्थापक श्री विनय राजे यांनी केले,