by : Ajay Gayakwad
वाशिम /
मालेगाव :- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया तारीख २७ पासून सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण एकदम तापायला सुरुवात झाली आहे कोरोनाच्या साथीमुळे या निवडणुका लांबल्या आहेत तीन वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.रात्री उशिरा पर्यंत चर्चा करून सकाळी गावाला भेट देऊन उमेदवार शोधत आहेत मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अठरा संचालक सदस्य निवडून दिले जाणार आहेत सेवा सहकारी मतदार संघातून सर्वसाधारण संचालक सदस्य म्हणून सात,महिला दोन,व इतर मागासवर्गीय एक,आणि विमुक्त जाती,भटक्या जमाती,एक असे अकरा संचालक सदस्य निवडून दिले जाणार आहेत तर ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण सदस्य दोन,अनुसूचित,जाती,जमाती एक,आर्थिक दुर्बल घटक एक,आडते व व्यापारी मतदारसंघातून दोन,आणि हमाल व मापारी मतदार संघातून एक,असे एकूण 18 सदस्य निवडून दिले जाणार आहेत त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार शोध मोहीम सुरू केली आहे.तसेच एक महिन्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत यावेळी ही निवडणूक फारच अतीतटीची आणि प्रतिष्ठेची होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चार एप्रिल आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी असल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते संभाव्य उमेदवाराचे नाव उघड होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे उमेदवारी अर्जांची छाननी पाच एप्रिलला आहे मात्र खरे चित्र वीस एप्रिला सायंकाळी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर जास्तीत जास्त सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राहिली आहे.यावेळी सुद्धा कृ.उ.बा.स.वर सत्ता राहावी म्हणून जोरदार प्रयत्न केले जात आहेत मात्र यावेळी सत्ता पालट होण्यासाठी भा.ज.पा.आणि बाळासाहेबांची सेना फारच सक्रिय झाली आहे.वंचित आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे.सेना यांनी सुद्धा बैठका घेऊन काम सुरू केले आहे निवडणूक सर्वच पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.ग्रामिण भागात पक्षाचे नेते तळ ठोकून बसले आहेत एकंदरीत आतून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.